जादवपुर (पश्चिम बंगाल) – केंद्रियमंत्री बाबुल सुप्रियोहे जादवपुर येथील विद्यापिठामध्ये एका कार्यक्रमानिमित्त आले असता कार्यक्रमानंतर एसएफआयया विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी घेराव घारत धक्काबुक्की केल्याची घटना घडली आहे.
यावेळी विद्यापिठात भारतीय जनता पार्टीशी निगडीत अखील भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी आयोजीत केलेल्या एका कार्यक्रमाच्या निमित्ताने सुप्रियो येथे उपस्थित राहिले होते. यावेळी सुप्रियोयांच्या विरोधात डाव्या आघाडीची विद्यार्थी परिषद असलेल्या स्टुडन्ट फेडरेशन ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करत त्यांना घेरले.
यानंतर सुप्रियोयांनी संबंधीत कार्यकर्त्यांना शांत रहाण्याची विनंती करुनही त्यांनी आक्रमकपणे आपल्या घोषणा आणि फलकबाजी चालू ठेवत सुप्रियोयांना धक्का-बुक्की केली.
संबंधीत घटना घडल्यानंतर पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धानकरयांनी चौकशीचे आदेश दिले असून केंद्रिय मंत्र्यांना झालेल्या धक्का-बुक्कीचा निषेध व्यक्त केला आहे.