एकदा हा व्हिडिओ पहाच; चालत्या ट्रेनमधून मोबाईल चोरणाऱ्याला लोकांनी पकडले, लटकत तसेच नेले पुढे

Updated On:

नवी दिल्ली – बिहारच्या बेगुसरायमध्ये चालत्या ट्रेनच्या खिडकीतून मोबाईल चोरण्याचा प्रयत्न करताना चोरट्याचा जीव गेला. या चोरट्याने स्थानकातून बाहेर पडणाऱ्या रेल्वेच्या खिडकीत हात घालून प्रवाशाचा मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न करताच प्रवाशाने ट्रेनच्या बाहेर खिडकीला त्या चोरट्याचा हाथ बांधून ठेवला. त्याला तब्बल 15 किमीपर्यंत  धावत्या ट्रेनमधून फरफटवत नेलं. या घटनेचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

रेल्वेतील प्रवाशांनी या चोरट्याला बेगुसरायच्या साहेबपूर कमल स्थानकावरून खिडकीला बांधून ठेवले.  दरम्यान, ट्रेन पुढे जात राहिली आणि चोर विनवणी करत राहिला की हात तोडेल भाऊ… नाहीतर मरेन. मात्र प्रवाशांनी त्याला सोडले नाही.

नंतर त्याला खगरिया स्थानकावर जीआरपीच्या ताब्यात या चोराला देण्यात आले. चोराला खिडकीला बांधून ठेवणाऱ्या व्यक्तीचे नाव  पंकज कुमार आहे. तो बेगुसरायच्या साहेबपूर कमल पोलीस स्टेशन परिसरातील रहिवासी आहे. त्याने चोरट्याविरुद्ध तक्रार केली आहे.  या व्हिडीओवर नेटकरी विविध प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत.

साहेबपूर कमल स्टेशन ते खगरिया हे अंतर १५ किमी आहे. प्रवाशांना हवे असते तर त्यांनी साखळी ओढून ट्रेन थांबवली असती, पण चोरट्याला धडा शिकवण्यासाठी त्यांनी ट्रेनच्या खिडकीला चोरट्याला लटकवून ठेवले. यादरम्यान काही प्रवाशांनी त्याचा व्हिडिओ बनवला. ट्रेन खगरिया स्थानकात पोहोचल्यावर तरुणाला ट्रेनला लटकलेले पाहून जीआरपी आले. प्रवाशांनी चोरट्याला त्यांच्या ताब्यात दिले.

आणखी संबंधित बातम्या

Satara News : सातारा पोलिसांची धडक कारवाई ! CEIR पोर्टलद्वारे १.५ कोटींचे ४४९ चोरीला गेलेले मोबाईल हस्तगत; नागरिकांना केले परत

2026-10-01 22:19:44

Satara News : सातारा पोलिसांची धडक कारवाई ! CEIR पोर्टलद्वारे १.५ कोटींचे ४४९ चोरीला गेलेले मोबाईल हस्तगत; नागरिकांना केले परत

UCC :  UCC वर केंद्र सरकारला मिळाली कोणाची साथ? ; कोण करतंय विरोध? , जाणून घ्या

2026-09-15 14:49:55

UCC :  UCC वर केंद्र सरकारला मिळाली कोणाची साथ? ; कोण करतंय विरोध? , जाणून घ्या

Congress News : काँग्रेसमध्ये खळबळ ! पक्षाने तब्बल 29 नेत्यांना बजावल्या कारणे दाखवा नोटिसा

2026-09-10 21:38:57

Congress News : काँग्रेसमध्ये खळबळ ! पक्षाने तब्बल 29 नेत्यांना बजावल्या कारणे दाखवा नोटिसा

Tejashwi Yadav : संघटित भ्रष्टाचारामुळे रेशन विक्रेते अडचणीत; तेजस्वी यादव यांचा आरोप

2026-09-09 16:48:25

Tejashwi Yadav : संघटित भ्रष्टाचारामुळे रेशन विक्रेते अडचणीत; तेजस्वी यादव यांचा आरोप

Nepal Floods News : बिहार, उत्तर प्रदेशमध्ये सतर्कतेचा इशारा.! नेपाळ आपत्तीमुळे नद्यांची पाणीपातळी वाढली

2026-08-27 15:51:13

Nepal Floods News : बिहार, उत्तर प्रदेशमध्ये सतर्कतेचा इशारा.! नेपाळ आपत्तीमुळे नद्यांची पाणीपातळी वाढली