“बबिता फोगाटला कुस्ती महासंघाचे अध्यक्ष व्हायचे होते, म्हणून कुस्तीपटूंचे आंदोलन…”, साक्षी मलिकचा मोठा खुलासा

Sakshi Malik | ऑलिम्पिक महिला कुस्तीपटू साक्षी मलिकने बबिता फोगाटबाबत मोठा दावा केला आहे. भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष आणि भाजपाचे माजी खासदार ब्रिजभूषण सिंह यांच्या विरोधात महिला कुस्तीपटूंनी आंदोलन केले होते.
संपूर्ण देशभरात या आंदोलनाची दखल घेतली गेली. मात्र ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात आंदोलन करण्यास भाजप नेत्या बबिता फोगटने खेळाडूंना प्रवृत्त केले होते, असा दावा ऑलिम्पिक पदक विजेती कुस्तीपटू साक्षी मलिकने केला आहे.
साक्षी मलिकचा दावा
“बबिता फोगटने कुस्तीपटूंची बैठक घेतली होती आणि त्यांना ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात गैरव्यवहार आणि विनयभंगाचे आरोप करण्यास सांगितले होते. बबिता फोगटचा स्वतःचा अजेंडा होता, त्यामुळे तिने आम्हाला ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात आंदोलन करण्यास प्रवृत्त केले. तसेच तिला भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष व्हायचे होते,” असे साक्षी मलिकने सांगितले. Sakshi Malik |
“काँग्रेसने आमच्या आंदोलनाला पाठिंबा दिला, अशी अफवा होती. पण हे असत्य आहे. उलट भाजपाच्याच दोन नेत्यांनी आम्हाला हरियाणामध्ये आंदोलन करायची परवानगी मिळवून दिली होती. त्यात बबिता फोगट आणि तीर्थ राणा यांचा समावेश होता. आम्हाला वाटले की, कुस्ती महासंघाला एखादी महिला अध्यक्ष त्यातही बबिता फोगाट सारखी खेळाडू प्रमुख म्हणून लाभली तर सकारात्मक बदल होऊ शकतील. तिला आमचा संघर्ष समजू शकते, अशी आमची अपेक्षा होती. पण ती आमच्याबरोबरच एवढा मोठा खेळ खेळेल, याची आम्हाला कल्पना नव्हती,” असे साक्षी मलिक म्हणाली. Sakshi Malik |
ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याबद्दल साक्षी मलिक म्हणाली की, ब्रिजभूषण शरण सिंह म्हणायचे की जे लोक त्यांच्याविरोधात आंदोलन करत होते ते संपले. मात्र, हरयाणा विधानसभा निवडणुकीत विनेश फोगटला मिळालेल्या यशावरून ब्रिजभूषण शरण सिंह यांचे दावे खोटे ठरल्याचे दिसून आले.” दरम्यान, गेल्या वर्षी अनेक महिला कुस्तीपटूंनी भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार ब्रिजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केला होता. त्यांच्याविरोधात चौकशीची मागणी करत दीर्घकाळ आंदोलन करण्यात आले होते.
हेही वाचा :
मविआतील तिढा सोडवण्यात यशस्वी होणार का बाळासाहेब थोरात ? ; शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंची भेट घेणा





