Babaji Kale – प्रशासन आणि लोकप्रतिनिधी ही विकासाची दोन चाके आहेत. ती दोन्ही बरोबरीने चालली आणि त्यांच्यात समन्वय राहिला, तर विकासाची कामे कमी वेळात व मनापासून पूर्ण होतात, असे प्रतिपादन आमदार बाबाजी काळे यांनी केले. खेड तालुक्यातील चांडोली (ता. खेड) येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिरात लाभार्थी, शेतकरी आणि नागरिकांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी तहसीलदार प्रशांत बेडसे, निवासी नायब तहसीलदार चेतन मोरे, महसूल नायब तहसीलदार राम बिजे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा जिल्हा परिषद सदस्य विजयसिंह शिंदे, जिल्हा परिषद सदस्या तनुजाताई घनवट, गणेश अरगडे, पंचायत समिती सभापती विद्याताई मोहिते, उपसभापती मंगेश सावंत, चांडोलीच्या सरपंच प्रिया पवार, कडूस मंडळाच्या मंडळ अधिकारी विद्या नांगरे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. आमदार काळे पुढे म्हणाले की, तालुक्याच्या विकासाची जबाबदारी माझ्यावर असून ती पूर्ण करण्यासाठी प्रशासनासोबत समन्वय ठेवून काम सुरू आहे. केवळ राजकारण म्हणून विरोध न करता प्रशासनाला सोबत घेऊन नागरिकांच्या अडचणी सोडविण्याचे काम सर्वांनी मिळून करणे गरजेचे आहे. तालुक्यातील प्रशासकीय यंत्रणा नागरिकांच्या सेवेसाठी जोमाने काम करत असल्याचे या अभियानातून दिसून येत आहे. तसेच शिबिरात तहसीलदार प्रशांत बेडसे यांनी शासनाच्या विविध योजनांची माहिती देत नागरिकांनी या योजनांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन केले. यावेळी आमदार बाबाजी काळे यांच्या हस्ते लाभार्थ्यांना सातबारा उतारे व विविध दाखल्यांचे वितरण करण्यात आले. स्वतःच्या वाढदिवसाची लगबग असतानाही आमदार बाबाजी काळे यांनी चांडोली येथे आयोजित महसूल समाधान शिबिराला उपस्थित राहून शेतकरी व नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यांच्या उपस्थितीमुळे शिबिरात आलेल्या नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान, त्यांच्या निवासस्थानी वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी तालुक्यातील विविध गावांमधून नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. लाभार्थ्यांना आमदार बाबाजी काळे यांचे यांच्या हस्ते लाभार्थ्यांना सातबारा वितरित करण्यात आले. शिबिरात तहसीलदार प्रशांत बेडसे यांनी शासनाच्या विविध योजनाचीमाहिती सांगितली विविध योजनांचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांनी घेण्याचे आवाहन महसूल प्रशासनाने केले. “तालुक्याचा विकास करताना विरोधासाठी विरोध न करता सर्व पक्षांच्या लोकप्रतिनिधींना सोबत घेऊन सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला जाईल.” – बाबाजी काळे, आमदार खेड-आळंदी