Baba Siddique : फडणवीसांच्या भेटीनंतर झिशान सिद्दीकींनी केली शेअर केली ‘रहस्यमय’ पोस्ट; वडिलांच्या मृत्यूबद्दल सांगितलं….

Zeeshan Siddique | Devendra Fadnvis : माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची गत आठवड्यात मुंबईत गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. या घटनेनंतर त्यांचे सुपुत्र आमदार झिशान सिद्दीकी यांनी शुक्रवारी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी फडणवीस यांच्याकडे न्यायाची मागणी करत आपल्या वडिलांच्या हत्येशी संबंधित सर्व धागेदोरे तपासण्याची मागणी करण्यात आली.
बाबा सिद्दीकी यांनी काही महिन्यांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यांची गत 12 ऑक्टोबर रोजी मुंबईतील त्यांच्या कार्यालयाबाहेर गोळ्या घालून हत्या करण्यात आली. ही हत्या लॉरेन्स बिश्नोई गँगने केल्याचा दावा केला जात आहे.
पोलिसांनी या प्रकरणी काही आरोपींना अटकही केली आहे. त्यांची चौकशी सुरू असातना झिशान सिद्दीकी यांनी शुक्रवारी दुपारी सागर बंगल्यावर जाऊन देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी त्यांना बाबा सिद्दीकी यांच्या हत्येच्या तपासाशी संबंधित इत्यंभूत माहिती देण्यात आली.
My father lost his life protecting and saving the lives and homes of poor innocent people. Today, my family is broken but his death must not be politicised and definitely not go in vain.
I NEED JUSTICE, MY FAMILY NEEDS JUSTICE!— Zeeshan Siddique (@zeeshan_iyc) October 17, 2024
यावेळी उभय नेत्यांमध्ये या प्रकरणाचे धागेदोरे कुठपर्यंत आहेत? यावरही उहापोह झाला. त्यानंतर झिशान यांनी प्रस्तुत प्रकरणात आपल्याला व आपल्या कुटुंबीयांना न्याय हवा असल्याचे स्पष्ट केले. उल्लेखनीय बाब म्हणजे झिशान सिद्दीकी यांनी गुरुवारी सायंकाळी एका ट्विटद्वारेही या प्रकरणाची न्यायाची मागणी केली होती.
Not all that is hidden sleeps,
Nor all that is visible speaks.— Zeeshan Siddique (@zeeshan_iyc) October 18, 2024
दरम्यान, देवेंद्र फडणवीसांच्या भेटी नंतर झिशान सिद्दीकी यांनी सोशल मीडियावर रहस्यमय पोस्ट केली आहे. जिशान सिद्दिकी यांनी पोस्टमध्ये लिहिले आहे की, ‘Not all that is hidden sleeps, Nor all that is visible speaks’ याचा अर्थ ‘ जे लपलेले सर्व झोपत नाही आणि जे दिसते ते बोलत नाही’ असा काही आहे.
त्यामुळे जिशान सिद्दिकी यांना या पोस्टमधून बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात काही इशारा देयायचा आहे का? हा ही एक प्रश्न आहे. दरम्यान, जिशान सिद्दिकी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीत बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणाचा तपासावर चर्चा झाली. या प्रकरणाची धागेदोरे कुठपर्यंत पोहचले आहेत, त्यावरही चर्चा झाली.





