Kedarnath: महाशिवरात्रीनिमित्त भक्तांसाठी आनंदाची बातमी! बाबा केदारनाथचे दरवाजे 2 मे रोजी उघडणार
Updated On:

Kedarnath: महाशिवरात्रीनिमित्त बाबा केदारनाथच्या भक्तांसाठी एक आनंदाची बातमी आहे. महाशिवरात्रीच्या शुभमुहूर्तावर मंदिराचे दरवाजे उघडण्याची तारीख जाहीर करण्यात आली आहे. यावर्षी 2 मे पासून केदारनाथ धामचे दरवाजे सकाळी 7 वाजता उघडतील. केदारनाथ धामचे दरवाजे शुभ मुहूर्तावर उघडले जातील. यासोबत चार धाम यात्रेलाही सुरुवात होणार आहे. केदारनाथ धाममध्ये स्थापित ज्योतिर्लिंग हे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे आणि पंच केदारमध्ये एक प्रमुख स्थान आहे. दरवर्षी हिवाळ्यात बर्फवृष्टीमुळे ते सहा महिने बंद ठेवले जाते.




