Ayodhya: श्री राम लल्ला प्राणप्रतिष्ठा विधींना प्रारंभ; 22 जानेवारीला मुख्य कार्यक्रम

अयोध्या (यूपी) – अयोध्येतील राम मंदिरातील मुर्ती प्रतिष्ठापनेच्या सोहळा विधीला आजपासून अयोध्येत प्रारंभ झाला आहे. प्रत्यक्ष मुर्ती प्रतिष्ठापना कार्यक्रम २२ जानेवारी रोजी होणार आहे. हे विधी २१ जानेवारीपर्यंत सुरू राहतील. २२ जानेवारी रोजी राम लल्लाच्या मूर्तीच्या प्राण प्रतिष्ठापनेसाठी आवश्यक किमान आवश्यक विधी केले जातील, असे मंदिर ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी पत्रकारांना सांगितले.
राम मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास म्हणाले, अनुष्ठान सुरू झाले आहे आणि ते 22 जानेवारी, अभिषेक समारंभाच्या दिवसापर्यंत सुरू राहणार आहे. अकरा पुजारी सर्व “देवी आणि देवता यांना आमंत्रण देणारे विधी करत आहेत. ट्रस्टने सांगितले की प्राण प्रतिष्ठा मध्ये सात अधिवास आहेत आणि १२१ आचार्य हे विधी चालवत आहेत. गणेश्वर शास्त्री द्रविड हे अनुष्ठान च्या सर्व कार्यवाहीची देखरेख, समन्वय आणि दिग्दर्शन करत आहेत.
मुख्य विधीचे प्रमुख “आचार्य” काशीचे लक्ष्मीकांत दीक्षित असतील. मुख्य कार्यक्रम २२ जानेवारी रोजी दुपारी 12:20 वाजता सुरू होईल.श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने जारी केलेल्या वेळापत्रकानुसार आधीचे विधी प्रयासचित आणि कर्मकुटी पूजन करून सुरू झाले. १७ जानेवारीला मूर्तीचा परिसर प्रवेश पूर्ण होईल, त्यानंतर १८ जानेवारीला ‘तीर्थपूजन’, ‘जल यात्रा’ आणि ‘गंधाधिवास’ आणि १८ जानेवारीला औषधाधिवास, केशराधिवास, घृताधिवास आणि १९ जानेवारीला धन्याधिवास विधी होतील.
२० जानेवारी रोजी शर्करा धिवास, फलाधिवास आणि पुष्पधिवासशी संबंधित विधी होणार आहेत. २१ जानेवारी रोजी वेळापत्रकानुसार मध्याधिवास आणि शैयाधिवास विधी पूर्ण होतील.





