Ayesha Khan: ‘मी रडू लागले होते’…. आयशा खानने पीरियड्समध्ये ‘धुरंधर’मधील ‘शरारत’ गाण्याचं केलं शूटिंग
चित्रपटातील ‘शरारत’ हे गाणे विशेष चर्चेत राहिले. हे गाणे अभिनेत्री आणि ‘बिग बॉस’ फेम आयशा खान तसेच क्रिस्टल डिसूजा यांच्यावर चित्रित करण्यात आले होते. दोघींच्या डान्स मूव्ह्सना प्रेक्षकांची भरभरून दाद मिळाली. जसलीन स्कॅंडल आणि मधुबंती बागची यांनी हे गाणे गायले असून ते चार्टबस्टर ठरले होते.

Ayesha Khan: आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कामगिरी केली असून ओटीटीवरही तो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. नेटफ्लिक्सच्या ट्रेंडिंग लिस्टमध्ये चित्रपट कायम वरच्या स्थानावर आहे. रणवीर सिंगसह सारा अर्जुन, राकेश बेदी, अर्जुन रामपाल, संजय दत्त आणि आर. माधवन यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाची कथा आणि गाणी दोन्हीही प्रचंड गाजली.
याच चित्रपटातील ‘शरारत’ हे गाणे विशेष चर्चेत राहिले. हे गाणे अभिनेत्री आणि ‘बिग बॉस’ फेम आयशा खान तसेच क्रिस्टल डिसूजा यांच्यावर चित्रित करण्यात आले होते. दोघींच्या डान्स मूव्ह्सना प्रेक्षकांची भरभरून दाद मिळाली. जसलीन स्कॅंडल आणि मधुबंती बागची यांनी हे गाणे गायले असून ते चार्टबस्टर ठरले होते.
अलीकडेच आयशा खानने एका मुलाखतीत या गाण्याच्या शूटिंगदरम्यानचा अनुभव शेअर केला. तिने सांगितले की ‘शरारत’ गाण्याचं शूटिंग अवघ्या दोन दिवसांत पूर्ण करण्यात आलं आणि ते तिच्यासाठी खूपच थकवणारे होतं. त्या काळात तिचे पीरियड्स सुरू होते, त्यामुळे शरीरावर आणि मनावर दोन्ही बाजूंनी ताण होता.
View this post on Instagram
आयशा म्हणाली की त्या दोन दिवसांत सतत डान्स, वेगवेगळे सीक्वेन्स आणि वेडिंग सीन शूट करावे लागत होते. वेळेची खूपच कमतरता होती. इतका डान्स केल्यानंतर शरीरातील हाडं दुखत होती आणि पीरियड्समुळे ती भावनिकही झाली होती. त्या क्षणी ती स्वतःला आवरू शकली नाही आणि रडू लागली. मात्र हे रडणं दुःखाचं नव्हतं, तर आनंद आणि समाधानाचे अश्रू होते, असं तिने स्पष्ट केलं.
क्रिस्टल डिसूजाबद्दल बोलताना आयशा खानने तिला आपली सीनियर कलाकार म्हटलं. तिला आधी वाटलं होतं की एखादी सीनियर अभिनेत्री असल्यामुळे काही नखरे असतील, पण प्रत्यक्षात क्रिस्टल खूपच गोड आणि सहकार्य करणारी असल्याचं आयशाने सांगितलं. क्रिस्टलसोबत काम करण्याचा अनुभव तिच्यासाठी खूपच सकारात्मक होता, असंही तिने नमूद केलं.






