जागतिक तापमानवाढीविरोधात तरुणांची मानवी साखळीद्वारे जनजागृती
Updated On:

पुणे – जगभरातील खाजगी कंपन्यांमुळे हरितगृह वायूंचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे जागतिक तापमानात वाढ होत असून त्याचा दुष्परिणाम आरोग्यावर जाणवू लागला आहे. याविरोधात फ्रायडेज फॉर फ्यूचर तर्फे अलका चौकामध्ये मानवी साखळी करुन जनजागृती करण्यात आली. यावेळी तरुणांनी डफली वाजवत घोषणाबाजी केली.









