पुणे जिल्हा | मंचरमध्ये हिंदू समाजाचा जनजागृती मृत्यू
Updated On:

मंचर, (प्रतिनिधी) – बांगलादेश व पश्चिम बंगाल येथे हिंदूबांधवा वरती होणारे अत्याचार व बदलापूर येथे तीन वर्षे मुलींवरती झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या विरोधात सकल हिंदू समाजाच्या वतीने मंचर (ता. आंबेगाव) येथे जनजागृती मोर्चा गुरुवार (दि. 22) काढण्यात आला.
मंचर येथील अण्णासाहेब आवटे कॉलेज पासून महामार्गाने धर्मवीर चंद्रशेखर अण्णा बाणखेले मार्ग, छत्रपती शिवाजी महाराज चौकात मोर्चा आला असताना छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रेरणा मंत्र व ध्येय मंत्र घेण्यात आले.
अण्णासाहेब आवटे कॉलेजमधील विद्यार्थी व विद्यार्थिनी व महात्मा गांधी महाविद्यालयामधील विद्यार्थी विद्यार्थिनी जनजागृती मोर्चामध्ये सहभाग घेतला.





