पुणे जिल्हा | प्रियदर्शनी स्कूलतर्फे पथनाट्याद्वारे रस्ता सुरक्षेबाबत जागृती

आळंदी, (वार्ताहर) – आळदी शहरातील नागरिकांना रस्ता सुरक्षेचे महत्त्व पटवून देण्यासाठी प्रियदर्शनी स्कूलतर्फे पथनाट्याद्वारे जनजागृती करण्यात आली. आळंदी हे पूर्वी ग्रामीण पोलीस विभागात होतो.
आता जेव्हापासून पिंपरी चिंचवड आयुक्तालय वाहतूक विभाग एकत्रितरित्या काम करीत असल्याने या ठिकाणी साधारण ३४ पोलिसांचा ताफा आळंदीत सातत्याने असतो.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश नांदुरकर यांच्या वतीने सुरक्षा सप्ताहासाठी, आळंदी पोलीस स्टेशन मच्छिंद्र शेंडे, सहायक पोलीस उपनिरीक्षक अंकुश वाडेकर महिला पोलीस शिपाई रेणुका माने, संगीता भाकरे, प्राचार्य अनिता नायर,जनार्दन पितळे आदी यावेळी उपस्थित होते.
प्रियदर्शनी शाळेतील विद्यार्थ्यांनी पथनाट्याद्वारे रस्ता सुरक्षाविषयक माहिती लोकांना सांगून जनजागृती केली. त्यानिमित्त दुचाकीस्वरांनी हेल्मेट घातल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच चार चाकी वाहन चालकांनाही सीटबेल्ट लावल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
वाहतूक नियमांची अंमलबजावणी करून आपली व वाहनाची काळजी कशी घ्यावी, या संदर्भात विद्यार्थ्यांनी विशेष प्रस्तावना देऊन पथनाट्याद्वारे जागृती केल्याबद्दल नागरिकांनी मुलांचे स्वागत आणि अभिनंदन केले.





