Nagar | जि.प.कर्मचारी सोसायटीच्या तज्ज्ञ संचालकपदी आव्हाड व निमसे

नगर, (प्रतिनिधी) – जिल्हा परिषद सर्व्हन्टस को ऑप क्रेडीट सोसायटीच्या तज्ज्ञ संचालकपदी (स्वीकृत )शेवगाव तालुक्यातील ढोरजळगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सहाय्यक संभाजी किसन आव्हाड व सा.बां.उपविभाग पंचायत समिती, पारनेर येथील कनिष्ठ सहाय्यक प्रशांत भास्कर निमसे यांची निवड करण्यात आली आहे.
जिल्हा परिषद सर्व्हन्टस को ऑप क्रेडीट सोसायटीच्या संचालक मंडळाची मासिक सभा संस्थेच्या कार्यालयात अध्यक्ष योगेंद्र पालवे यांच्या अध्यक्षते खाली झाली.
या सभेत पॅनल प्रमुख संजय कडूस यांनी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमा नुसार संस्थेच्या सभासदांमधून २ तज्ज्ञ संचालक नियुक्त करण्याची तरतूद आहे.त्यानुसार संचालकांनी सहमती दर्शवित एकमताने संभाजी आव्हाड व प्रशांत निमसे यांची निवड केली. यावेळी अध्यक्ष योगेंद्र पालवे, उपाध्यक्ष डॉ. दिलीप डांगे व सर्व संचालक यांनी नूतन स्वीकृत संचालकांचे अभिनंदन केले.
यावेळी प्रशांत मोरे, विक्रम ससे, विलास शेळके, अरुण जोर्वेकर, भाऊसाहेब चांदणे, राजू दिघे, चंद्रकांत संसारे, ऋषिकेश बनकर, स्वप्नील शिंदे, कल्याण मुटकुळे, सुधीर खेडकर, श्रीकांत देशमाने, काशिनाथ नरोडे, कैलास डावरे, अर्जुन मंडलिक, संचालिका ज्योती पवार, सुरेखा महारनूर, मनीषा साळवे, व्यवस्थापक राजेंद्र पवार, उपव्यवस्थापक प्रशांत लोखंडे उपस्थित होते.





