Avinash Jadhav : अवघ्या २४ तासांत अविनाश जाधव यांचा युटर्न; राजीनामा घेतला मागे, नेमकं काय घडलं….

Avinash Jadhav – विधानसभा निवडणुकीत झालेल्या सपाटून पराभवानंतर मनसेला आणखी एक धक्का बसला. राज ठाकरेंच्या गटातील एका मोठ्या नेत्याने जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे मनसेला ठाणे, पालघर जिल्ह्यात मोठे खिंडार पडले आहे. मनसे ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी काल जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. ठाणे पालघरमध्ये पक्षाच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत अविनाश जाधव यांनी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला असल्याचं सांगितलं.
याबाबत त्यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. ठाणे आणि पालघर जिल्ह्यात अविनाश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली उमेदवारांनी निवडणूका लढविल्या होत्या. अविनाश जाधव स्वतः ठाणे शहर मतदारसंघातून निवडणूकीच्या मैदानात होते. परंतु भाजपचे उमेदवार संजय केळकर यांनी त्यांचा पराभव केला.
माझ्या ठाणेकरांनी माझ्यावर भरभरून प्रेम केलं. प्रचारादरम्यान अनेकांनी मला मोठ्या आदरानं स्वीकारल.. तुमच्या प्रेमाचा नेहमीच ऋणी असेल. तुम्ही दाखवलेला विश्वास सार्थकी लावेल. आपले आशीर्वाद नेहमीच भेटो हीच सद्धीच्छा.. मनापासून आभार..🙏🏻🙏🏻🙏🏻
— avinash jadhav (@avinash_mns) November 20, 2024
ठाणे जिल्ह्यातील मनसेच्या इतर उमेदवारांचाही पराभव झाला. या पराभवाची जबाबदारी स्वीकारत अखेर अविनाश जाधव यांनी जिल्हाध्यक्ष पदावरून राजिनामा दिला आहे. या निर्णयामुळे मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान, राजीनामा दिल्यास 24 तास उलटत नाहीत तोवर त्यांनी राजीनामा घेतला आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार हा राजीनामा मागे घेत असल्याचं अविनाश जाधव म्हणाले. त्यांनी ट्विट करत याबद्दल माहिती दिली आहे. काल अविनाश जाधव यांनी राजिनाम्याचे पत्र पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांना दिले होते. परंतु, त्यांचा राजीनामा स्वीकारला गेला नाही. उलट त्यांना पुन्हा या दोन्ही जिल्ह्यांचं अध्यक्षपद सांभाळण्याचे आदेश देण्यात आले.
अविनाश जाधव यांचं ट्विट :
आदरणीय राजसाहेब माझ्या रक्तात आहेत..
राजसाहेबांनी मला ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष म्हणून असलेली जबाबदारी पाहण्याचा आदेश दिला आहे. आम्हा महाराष्ट्र सैनिकांसाठी राजसाहेबांचा आदेश हा अंतिम असतो आणि त्याचा सन्मान मी नेहमीच आदराने करतो.. मी महाराष्ट्र सैनिक प्रथम, बाकी पद नंतर..🙏🏻— avinash jadhav (@avinash_mns) December 2, 2024
‘आदरणीय राजसाहेब माझ्या रक्तात आहेत.. राजसाहेबांनी मला ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष म्हणून असलेली जबाबदारी पाहण्याचा आदेश दिला आहे. आम्हा महाराष्ट्र सैनिकांसाठी राजसाहेबांचा आदेश हा अंतिम असतो आणि त्याचा सन्मान मी नेहमीच आदराने करतो.. मी महाराष्ट्र सैनिक प्रथम, बाकी पद नंतर..’





