अहमदाबाद – भारताच्या अंडर-19 संघाचा माजी कर्णधार अवि बरोट यांच शुक्रवारी कार्डिया अरेस्टने निधन झालं. 29 वर्षीय बरोट २०२० मध्ये रणजी ट्रॉफी विजेत्या सौराष्ट्र संघाचा सदस्य होता.
सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने बरोटच्या निधनासंदर्भात प्रेस रिलीज काढली आहे. असोसिएशनने बरोटला प्रतिभावान खेळाडू म्हटलं असून त्याच्या निधनावर शोक व्यक्त केला. बरोटच्या निधनाने भारतीय क्रिकेट जगतात शोककळा पसरली आहे.
माजी भारतीय क्रिकेटपटू वसीम जाफरने देखील बरोटच्या निधनावर दु:ख व्यक्त केलं आहे. 15 ऑक्टोबरला हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने बरोटचे निधन झाल्याचे सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
Our hearts bleed as outstanding player and very noble being Avi Barot is no more with us. It’s extremely shocking and saddening. May his noble soul be in shelter of benevolent Almighty. Avi, you shall be missed forever #rip @saucricket @GCAMotera @BCCI @BCCIdomestic #cricket pic.twitter.com/wzRONq95JV
— Saurashtra Cricket (@saucricket) October 16, 2021
बरोट हा यष्टीरक्षक होता आणि तो फिरकी गोलंदाजीही करायचा. 2011 साली अंडर-१९ संघाचा कर्णधार असलेल्या अवी बारोटने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये 53 चेंडूत 122 धावा फटकावल्या होत्या. अवी बारोटने 38 प्रथम दर्जाचे सामने खेळले असून त्याने अ दर्जाचे 38 आणि 20 देशांतर्गत T20 सामनेही खेळले आहेत.