Wagholi : आव्हाळवाडी ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी अविनाश कुटे यांची बिनविरोध निवड
Wagholi : हवेली तालुक्यातील आव्हाळवाडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी अविनाश कुटे यांची बिनविरोध निवड झाली. एकमेव अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी निवड जाहीर केली.

Wagholi : आव्हाळवाडी तालुका हवेली या ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदी अविनाश कुटे यांची बिनविरोध निवड झाली असून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. उपसरपंच पदाचा राजीनामा अमोल आव्हाळे यांनी दिल्याने जागा रिक्त झाली होती.
सरपंच नितीन घोलप यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या निवडणुकीत अविनाश कुटे यांचा एकमेव अर्ज आल्याने ही निवडणूक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी बिनविरोध घोषित केली.
याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य प्रशांत रघुनाथ सातव, सोनाली दाभाडे, काकासाहेब सातव, सारिका सातव, सविता सातव, सोमनाथ आव्हाळे, मंगेश सातव, पल्लवी नारायण आव्हाळे, बदामबाई आव्हाळे आदी ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.
उपसरपंच पदी निवड झाल्याबद्दल अविनाश कुटे यांचे आमदार माऊली कटके, पंचायत समिती हवेली सभापती नारायण आव्हाळे, माजी उपसरपंच संदेश आव्हाळे, नितीन आव्हाळे, माजी हेमंत सातव, गणेश कुटे, शरद आव्हाळे, विक्रम कुटे आदींनी अभिनंदन केले आहे.





