#Autozone2019 : बाफना ऑटोमोटिव्ह तर्फे ‘इंट्रा’ आणि ‘योद्धा’ वाहन सादर केले

शिरूर – पुण्याच्या ग्रामीण भागात वाहन विक्री आणि उद्योगाला चालना मिळण्याच्या हेतूने, “पुण्याची ओळख’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या दै. प्रभातच्या वतीने “ऑटो झोन-2019′ या कार्सच्या तीन दिवसीय प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
दरम्यान, यावेळी बाफना ऑटोमोटिव्ह तर्फे ‘इंट्रा’ आणि ‘योद्धा’ हे दोन वाहन सादर करण्यात आले.
इंट्रा – मालवाहतुकीच्या गरजा ध्यानात घेऊन टाटा मोटर्सने मे महिन्यापासून भारतीय बाजारपेठेत टाटा इंट्रा नावाचे नवीन मालवाहतूक चारचाकी वाहन उपलब्ध केले आहे. ज्यांना यापेक्षा अधिक दर्जेदार आणि मोठे ट्रक हवे आहेत त्यांच्यासाठी टाटा इंट्रा हे वाहन उपलब्ध करण्यात आले.
टाटा इंट्रामध्ये माल वाहण्याची अधिक क्षमता आहेच त्याचबरोबर चालकाला कमी त्रास आणि थकवा होईल याची पुरेपूर काळजी घेण्यात आली आहे. त्यामुळे हे वाहन व्यापारी आणि व्यावसायिकांमध्ये वेगात लोकप्रिय होऊ लागले आहे.
योद्धा – देशभरातील व्यावसायिक आणि व्यापाऱ्यांच्या गरजा ध्यानात घेऊन त्यांच्यासाठी आवश्यक त्या प्रकारातील वाहने उपलब्ध करण्यासाठी टाटा मोटर्सने संशोधन आणि विकास करणे चालूच ठेवले आहे. त्यातूनच टाटा ‘योद्धा’ आकारास आलेला आहे. टाटा मोटर्सने याअगोदर उपलब्ध केलेल्या झेनॉनपेक्षा योद्धामध्ये बरीच नवीन वैशिष्ट्य उपलब्ध करण्यात आली आहेत. यामध्ये अधिक माल अधिक कार्यक्षमपणे वाहून नेण्याची व्यवस्था उपलब्ध करण्यात आली आहे.
एलसीव्ही टाटा योद्धा 5 नव्या प्रकारामध्ये उपलब्ध करण्यात आला आहे. इंजिनची क्षमता 85 हॉर्सपॉवरपर्यंत आहे. तर, इंजिन 4 सिलिंडर 2956 सीसीचे असल्यामुळे अधिक माल सहज वाहून नेला जाऊ शकतो. पॉवर स्टेअरिंगमुळे चालकाचा वाहनावर मजबूत ताबा राहतो. पुढील सन्स्पेशन सहा स्प्रिंगचे तर मागील सन्स्पेशन उत्तम आहे. त्यामुळे मालवाहतुकीवेळी धक्के बसण्याचे प्रकार कमी होतात. अधिक क्षमतेचे इंजिन असल्यामुळे प्रसंगी प्रतितासाला 80 कि.मी.पर्यंत वेग वाढू शकतो.





