Australia vs West Indies 3rd ODI : ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यातही वेस्ट इंडिजचा वाईट पद्धतीने पराभव केला. कांगारूंनी तिसरा एकदिवसीय सामना 259 चेंडू शिल्लक असताना जिंकला. स्टीव्ह स्मिथच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने तीन सामन्यांची वनडे मालिका 3-0 अशी जिंकली.
झेवियर बार्टलेट (4 विकेट) यांची घातक गोलंदाजी आणि त्यानंतर जेक फ्रेझर-मॅकगर्क आणि जोश इंग्लिस यांच्या तुफानी फलंदाजीच्या बळावर ऑस्ट्रेलियाने वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात ऐतिहासिक विजय नोंदवला. कांगारूंनी तिसरा एकदिवसीय सामना 259 चेंडू शिल्लक असताना जिंकला. यासह ऑस्ट्रेलियाने तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत निर्विवाद वर्चस्व गाजवले.
Congratulations to our Aussie men for clean sweeping the Dettol ODI Series against the West Indies!
Time for some T20 fireworks 🎇 pic.twitter.com/2IPQeWZoyj
— Cricket Australia (@CricketAus) February 6, 2024
एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक चेंडू शिल्लक असताना हा सातवा सर्वात मोठा विजय आहे. सर्वाधिक चेंडू शिल्लक असताना लक्ष्य गाठण्याचा विक्रम इंग्लंडच्या नावावर आहे. इंग्लंडने 1979 मध्ये 277 चेंडू शिल्लक असताना सामना जिंकला होता. यानंतर श्रीलंका आहे. श्रीलंकेने 2001 मध्ये झिम्बाब्वेविरुद्धचा सामना 274 चेंडू शिल्लक असताना जिंकला होता.
प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेला वेस्ट इंडिजचा संघ 24.1 षटकांत अवघ्या 86 धावांत गारद झाला. यानंतर ऑस्ट्रेलियाने केवळ 6.5 षटकांत 87 धावांचे लक्ष्य गाठले. जेक फ्रेझर-मॅकगर्कने 18 चेंडूंत 5 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 41 धावा केल्या. जोश इंग्लिसने 16 चेंडूत नाबाद 35 धावा केल्या. इंग्लिसने 4 चौकार आणि 1 षटकार मारला.
तत्पूर्वी, नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या वेस्ट इंडिजची पुन्हा एकदा खराब सुरुवात झाली. तिसऱ्या षटकात 13 धावांच्या एकूण धावसंख्येवर वेस्ट इंडिजला पहिला धक्का बसला. केजॉर्न ओटली सात चेंडूंत दोन चौकारांच्या मदतीने आठ धावा करून बाद झाला. यानंतर अलिक अथंजे आणि केसी कार्टी यांच्यात 25 धावांची भागीदारी झाली, पण दुसरी विकेट पडताच वेस्ट इंडिजचा संघ पत्त्यासारखा कोसळला. 38 धावांवर दुसरी विकेट गमावल्यानंतर विंडीजने ठराविक अंतराने विकेट गमावल्या. यादरम्यान केसी कार्टी 10, कर्णधार शाई होप 04, टेडी बिशप 00, रोमॅरियो शेफर्ड 01, ॲलिक अथंजे 32, मॅथ्यू फोर्ड 00, अल्झारी जोसेफ 06 आणि गुडाकेश मोटी 00 धावांवर बाद झाले. वेस्ट इंडिजच्या संघाचे स्कोअरकार्ड बघितल्यावर असे वाटले की जणू काही एसटीडी कोड आहे.
FIFA World Cup 2026 : विश्वकरंडक रंगणार अमेरिका, मेक्सिको व कॅनडात; फिफाकडून वेळापत्रक जाहीर…
ऑस्ट्रेलियाकडून गोलंदाजी करताना झेवियर बार्टलेटने 21 धावांत 4 बळी घेतले. लान्स मॉरिस आणि ॲडम झाम्पानेही प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. याशिवाय शॉन ॲबॉटला एक विकेट मिळाली. वेस्ट इंडिजचा एक खेळाडू धावबाद होऊन पॅव्हेलियनमध्ये परतला.