आमच्या मार्गात शकीबचा अडथळा – लॅंगर
Updated On:

नॉटिंगहॅम – शकीब हा सर्वच स्वरूपाच्या क्रिकेटमधील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू आहे. आमच्या विजयाच्या मार्गात त्याचाच मुख्य अडथळा असणार आहे. येथील खेळपट्टी कोरडी व ठणठ्णीत असल्यामुळे आम्ही फिरकी गोलंदाजाला संधी देणार आहोत. अष्टपैलू खेळाडू मार्कस स्टोईनिस हा तंदुरूस्त नसल्यामुळे आम्ही एक दोन सामन्यांमध्ये चार वेगवान गोलंदाजांवर भर दिला होता. आता तो तंदुरूस्त झाल्यामुळे आमची काळजी मिटली आहे असे ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक जस्टीन लॅंगर यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, आमच्या संघात व्यावसायिक दृष्टीने खेळणाऱ्या खेळाडूंचा समावेश आहे. संघात वरिष्ठ व युवा खेळाडूंचा योग्य समतोल आहे. बांगलादेशकडे आश्चर्यजनक विजय नोंदविण्याची क्षमता आहे. त्यामुळेच आम्ही शेवटपर्यंत सकारात्मक व गांभीर्याने खेळणार आहोत.





