AUS vs ENG : ऑस्ट्रेलियाने केला ‘वर्ल्ड रेकॉर्ड’! इंग्लंडचा धुव्वा उडवत ‘या’ मोठ्या विक्रमांची केली नोंद

ट्रेव्हिस हेडचे वादळी शतक –
२०५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाकडून जेक वेदराल्ड आणि ट्रॅव्हिस हेड सलामीला आले. हेडने मैदानावर चौफेर फटकेबाजी करत केवळ ८३ चेंडूत १६ चौकार आणि ४ षटकारांसह अविश्वसनीय १२३ धावांची खेळी केली. हेड आणि वेदराल्ड यांनी पहिल्या विकेटसाठी ७५ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. त्यानंतर मार्नस लाबुशेनने देखील ५१ धावांचे योगदान दिले. या खेळाडूंच्या शानदार कामगिरीमुळे ऑस्ट्रेलियाने २०५ धावांचे लक्ष्य केवळ २८.२ षटकांत पूर्ण केले.
ऑस्ट्रेलियाच्या नावावर झाले दोन जागतिक विक्रम –
- सर्वात जलद पाठलाग : कसोटीमध्ये २०० हून अधिक धावांचे लक्ष्य सर्वात कमी षटकांत (२८.२ ओव्हर्स) पूर्ण करणारा ऑस्ट्रेलिया हा जगातील पहिला संघ ठरला. यापूर्वीचा विक्रम १९९४ मध्ये इंग्लंडच्या नावावर होता (२०४ धावांचा पाठलाग ३५.३ षटकांत).
- सर्वाधिक रनरेट : ऑस्ट्रेलियाने २८.२ षटकांत ७.२३ च्या सर्वोच्च रनरेटने हे लक्ष्य पूर्ण केले. २०० हून अधिक धावांचा पाठलाग करताना हा कसोटी क्रिकेटमधील सर्वोच्च रनरेट ठरला आहे.
हेही वाचा – IND vs SA : कुलदीपची जादू अन् भारताचा जबरदस्त पलटवार! पहिल्या दिवसाखेर द. आफ्रिका २४७/६
मिचेल स्टार्क ‘प्लेअर ऑफ द मॅच’ ठरला –
ऑस्ट्रेलियाच्या या ऐतिहासिक विजयात मिचेल स्टार्कच्या गोलंदाजीचाही मोठा वाटा राहिला. त्याने पहिल्या डावात ७ आणि दुसऱ्या डावात ३ अशा एकूण १० विकेट्स घेत इंग्लंडच्या फलंदाजांना मोठी धावसंख्या उभारू दिली नाही. या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्याला ‘प्लेअर ऑफ द मॅच’ पुरस्काराने गौरवण्यात आले.





