17 Player Squad : २०२७ वनडे वर्ल्ड कपमध्ये संघांचा ताण वाढणार! ऑस्ट्रेलियन प्रशिक्षक अँड्र्यू मॅकडोनाल्ड यांची आयसीसीकडे मोठी मागणी
17 Player Squad : ऑस्ट्रेलियाचे विश्वचषक विजेते प्रशिक्षक अँड्र्यू मॅकडोनाल्ड यांनी आयसीसीकडे १५ ऐवजी १७ खेळाडूंचा संघ निवडण्याची परवानगी देण्याची मागणी केली आहे.

Australia Coach Andrew McDonald Demands 17 Player Squad 2027 ODI World Cup ICC Format Change : दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबिया यांच्या संयुक्त यजमानपदाखाली होणाऱ्या २०२७ वनडे विश्वचषक स्पर्धेच्या नव्या फॉरमॅटवरून आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चर्चांना उधाण आले आहे. नव्या फॉरमॅटनुसार अंतिम फेरी गाठण्यासाठी संघांना अधिक सामने खेळावे लागणार आहेत. या वाढत्या सामन्यांमुळे खेळाडूंचा होणारा थकवा आणि दुखापतींचा धोका लक्षात घेता ऑस्ट्रेलियाचे विश्वचषक विजेते प्रशिक्षक अँड्र्यू मॅकडोनाल्ड (Andrew McDonald) यांनी आयसीसीकडे १५ ऐवजी १७ खेळाडूंचा संघ निवडण्याची परवानगी देण्याची मागणी केली आहे.
२०२७ च्या विश्वचषकात खेळावे लागणार १५ सामने!
२०२३ च्या विश्वचषकात अंतिम फेरी गाठणाऱ्या संघाने ११ सामने खेळले होते. मात्र, २०२७ च्या नव्या फॉरमॅटनुसार काही संघांना अंतिम फेरीपर्यंत पोहोचण्यासाठी तब्बल १५ सामने खेळावे लागू शकतात. अव्वल संघांनाही किमान १३ सामने खेळावे लागतील. खेळाडूंवरील हा मानसिक आणि शारीरिक ताण पाहता मॅकडोनाल्ड यांनी खेळाडूंची संख्या वाढवण्यावर भर दिला आहे.
ट्रॅव्हिस हेड आणि फिफा विश्वचषकाचा दाखला!
Australia head coach Andrew McDonald calls for expanded 17-player squads for next year’s ODI World Cup.
Finalists are set to play 13 games at the tournament, up from 11 at the last edition pic.twitter.com/zsuzdRlz0o
— Cricinfo (@cricinfo) July 29, 2026
‘एसईएन’ रेडिओशी बोलताना मॅकडोनाल्ड म्हणाले, “२०२३ च्या विश्वचषकात ट्रॅव्हिस हेडच्या दुखापतीमुळे आम्हाला सुरुवातीला केवळ १४ खेळाडूंसह खेळावे लागले होते. आयसीसीच्या नियमांनुसार एकदा खेळाडू बदलला की मूळ खेळाडू परत खेळू शकत नाही.” यावर तोडगा म्हणून त्यांनी फुटबॉल (FIFA) वर्ल्ड कपचे उदाहरण दिले. फुटबॉलमध्ये केवळ ८ सामने खेळण्यासाठी २६ खेळाडूंचा संघ असतो, तर क्रिकेटमध्ये सामने जास्त असूनही संघ मर्यादित आहे.
आयसीसी १५ खेळाडूंच्या नियमावर ठाम?
🚨 2027 ODI World Cup: Andrew McDonald’s Key Demands & Concerns 🇦🇺
– Wants ICC to increase squad size from 15 to 17 players.
– Expanded format means teams could play 13-15 matches.
– Says a 15-player squad isn’t enough for such a long tournament.
– Larger squads would help… pic.twitter.com/ntNltiHm4t
— Shubh 🏏 (@HexaStatz) July 29, 2026
मॅकडोनाल्ड यांनी ही मागणी लावून धरली असली, तरी आयसीसी १५ सदस्यांच्या नियमात बदल करण्याच्या विचारात नसल्याचे मानले जात आहे. खेळाडूंची संख्या वाढवण्याऐवजी सामन्यांमध्ये किमान दोन दिवसांचा विश्रांतीचा (Rest Period) कालावधी देण्यावर आयसीसीचा भर असेल.





