AUS vs SA : दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच भूमीत धूळ चारत रचला इतिहास! अशी कामगिरी करणारा ठरला पहिलाच संघ

AUS vs SA South Africa 9 ODI Series win against Australia : दक्षिण आफ्रिकेची क्रिकेट टीम सध्या शानदार फॉर्ममध्ये आहे. नुकतेच त्यांनी प्रथमच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचे जेतेपद पटकावून इतिहास रचला होता. फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाला पराभूत करत त्यांनी हा पराक्रम केला होता. आता दक्षिण आफ्रिकेच्या संघाने ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच भूमीत हरवून क्रिकेट विश्वात खळबळ उडवून दिली आहे. यासह एक खास मोठा पराक्रमही नोंदवला आहे.
सध्या दक्षिण आफ्रिकेचा संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असून तीन सामन्यांची एकदिवसीय (ODI) मालिका खेळत आहे. पहिल्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाला 98 धावांनी पराभूत केले होते. आता दुसऱ्या सामन्यातही 84 धावांनी दमदार विजय मिळवत मालिकेत 2-0 अशी अजेय आघाडी घेतली आहे. यासह त्यांनी मालिका जिंकून एकदिवसीय क्रिकेटमध्ये नवा कीर्तिमान स्थापित केला आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा विक्रमी पराक्रम –
– SA won the ODI series in 2016.
– SA won the ODI series in 2018.
– SA won the ODI series in 2019.
– SA won the ODI series in 2023.
– SA won the ODI series in 2025.Fifth Consecutive ODI series against Australia by South Africa. 🤯🔥 pic.twitter.com/KY7IwT7mkX
— Johns. (@CricCrazyJohns) August 22, 2025
दक्षिण आफ्रिकेच्या संघाने सहा वेळा विश्वविजेता ठरलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक एकदिवसीय मालिका जिंकण्याचा विक्रम नोंदवला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा हा नववा एकदिवसीय मालिका विजय आहे. या यादीत इंग्लंड आठ मालिका विजयांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे, तर भारत सहा मालिका विजयांसह तिसऱ्या स्थानावर आहे.
हेही वाचा – Dinesh Karthik : ‘श्रेयस अय्यर कसा बाहेर राहू शकतो?’ संतप्त दिनेश कार्तिकचा निवड समितीला सवाल, पाहा VIDEO
ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक द्विपक्षीय एकदिवसीय मालिका (किमान 3 सामन्यांच्या) जिंकणारे संघ:
- दक्षिण आफ्रिका: 9 (15 मालिकांमधून)
- इंग्लंड: 8 (21 मालिकांमधून)
- भारत: 6 (14 मालिकांमधून)
- श्रीलंका: 4 (8 मालिकांमधून)
- पाकिस्तान: 4 (11 मालिकांमधून)
- वेस्ट इंडिज: 2 (11 मालिकांमधून)
- न्यूझीलंड: 2 (14 मालिकांमधून)
हेही वाचा – AUS vs SA : लुंगी एनगिडीने रचला इतिहास! ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडेत ‘हा’ खास पराक्रम करणारा ठरला पहिलाच खेळाडू
दक्षिण आफ्रिकेने सलग पाचवी मालिका जिंकली –
दक्षिण आफ्रिकेचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमधील दबदबा 2016-17 पासून कायम आहे. त्यांनी सलग पाचव्या एकदिवसी. मालिकेत ऑस्ट्रेलियाला पराभूत केले आहे. 2016-17 नंतर दुसऱ्यांदा दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाच्या भूमीत एकदिवसीय मालिका जिंकली आहे. या कामगिरीवरून दक्षिण आफ्रिकेच्या संघाच्या वर्चस्वाचा अंदाज येतो. हा ऐतिहासिक विजय क्रिकेटप्रेमींसाठी एक अविस्मरणीय क्षण आहे. आता तिसऱ्या एकदिवसीय सामन्यातही त्यांच्याकडून अशाच दमदार कामगिरीची अपेक्षा आहे.





