AUS vs NZ : मिशेल मार्शच्या ऐतिहासिक शतकाने न्यूझीलंडला चारली धूळ, २० वर्षांपूर्वीचा पॉन्टिंगचा मोडला विक्रम

ऑस्ट्रेलियाच्या वेगवान माऱ्यासमोर न्यूझीलंडच्या फलंदाजांचे लोटांगण –
न्यूझीलंडमध्ये झालेल्या या मालिकेतील पहिला सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला होता, तर दुसरा सामना शुक्रवारी (3 ऑक्टोबर) पावसामुळे रद्द झाला. माउंट माउनगनुई येथे शनिवारी (4 ऑक्टोबर) झालेल्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या वेगवान गोलंदाजीने न्यूझीलंडच्या फलंदाजीची दाणादाण उडवली. प्रथम फलंदाजी करणाऱ्या न्यूझीलंडने 9.1 षटकांत अवघ्या 77 धावांत 4 गडी गमावले. यापैकी चार फलंदाजांनी मिळून केवळ 26 धावा केल्या.
Captain Mitchell Marsh achieved his maiden T20I century, contributing to Australia’s victory by 3 wickets and securing the series 2-0.#NZvAUS #MitchellMarsh #Australia pic.twitter.com/V4UCWTK9u4
— Circle of Cricket (@circleofcricket) October 4, 2025
मात्र, सलामीवीर टिम सायफर्टने (48 धावा) एका बाजूने आक्रमक खेळ करत कर्णधार मायकेल ब्रेसवेल आणि अष्टपैलू जेम्स नीशम यांच्या साथीने न्यूझीलंडला 9 गडी गमावून 156 धावांपर्यंत मजल मारुन दिली. ऑस्ट्रेलियाकडून शॉन अॅबटने सर्वाधिक 3, तर जोश हेझलवूड आणि झेव्हियर बार्टलेट यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.
हेही वाचा – Rohit Sharma : ‘बीसीसीआयला लाज आहे का?’, रोहित शर्माला कर्णधारपदावरुन हटवल्याने चाहत्यांचा संतप्त सवाल
मिशेल मार्शने झळकावले पहिले टी-20 शतक –
यानंतर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मिशेल मार्शने आपली खरी ताकद दाखवली. मालिकेतील पहिल्या सामन्यात 85 धावांची तुफानी खेळी खेळणाऱ्या मार्शने यावेळी शतक ठोकत सामना खिशात घातला. दुसऱ्या बाजूने त्याला इतर फलंदाजांची फारशी साथ मिळाली नाही. ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या सहा फलंदाजांपैकी इतर पाच जणांनी मिळून केवळ 21 धावा केल्या आणि कोणीही दुहेरी आकडा गाठला नाही. तरीही, मार्शने एकहाती न्यूझीलंडच्या गोलंदाजांचा सामना केला आणि अवघ्या 50 चेंडूत 8 चौकार आणि 7 षटकारांसह टी-20 आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतील पहिले शतक पूर्ण केले.
हेही वाचा – Rohit Sharma : ‘रोहितला कर्णधारपदावरून हटवणे धक्कादायक, गिलला अजून वेळ होता…’, हरभजन सिंगचं वक्तव्य
मार्शने मोडला 20 वर्षांचा विक्रम –
ऑस्ट्रेलियाने 18 षटकांत 160 धावांचे लक्ष्य 3 गडी गमावून पूर्ण केले, ज्यामध्ये मार्शच्या 103 धावांचा (8 चौकार, 7 षटकार) सिंहाचा वाटा होता. या खेळीने मार्शने 20 वर्षे जुना विक्रमही मोडला. 2005 मध्ये ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात ऑस्ट्रेलियाचा तत्कालीन कर्णधार रिकी पॉन्टिंगने नाबाद 98 धावा केल्या होत्या. मार्शने ही कामगिरी मागे टाकत ऑस्ट्रेलियाच्या टी-20 इतिहासातील सर्वोत्तम वैयक्तिक खेळीचे नवे पर्व लिहिले.





