Pune : १७ ऑगस्ट शिवचातुर्य दिन म्हणून साजरा केला जाणार; मंत्री आशिष शेलारांची घोषणा, गरूडझेप मोहिमेच्या मागणीला यश

पुणेः छत्रपती श्री. शिवाजी राजे व शंभु राजे आपल्या सहकाऱ्यांसह लाल किल्ला आग्रा येथून नजर कैदीतून सुखरूप १७ ऑगस्ट रोजी बाहेर पडले हा दिवस हा दिवस शिवचातुर्य दिन म्हणून साजरा व्हावा, अशी घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी केल्याबद्दल गुरुड झेप मोहिमेचे संस्थापक अध्यक्ष अॅड मारुती आबा गोळे यांनी महाराष्ट्र शासन व आशिष शेलार यांचे आभार मानले.
छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याहून राजगडला चातुर्याने यांनी सुखरूप पोहोचले यांच्या स्मरणार्थ अॅड. मारुती आबा गोळे व गरुडझेप मोहिमेचे हजारो शिवभक्त सदस्य सहभागी झाले होते. तब्बल १३५० किलोमीटर अंतर शिवज्योत घेऊन ४ राज्य व ५७ शहरातून धावत राजधानी राजगड येथे दाखल झाले. या मोहिमेचा किल्ले राजगड पद्मावती देवी मंदिरात सांगता समारोह पार पडला. लवकरच गरुडझेप मोहिमेचे सदस्य सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड आशिष शेलार यांना भेटून १७ ऑगस्ट २०२५ या दिवशी होणाऱ्या कार्यक्रमाचे आमंत्रण देण्यात येणार आहे.





