चला काश्मीर जाऊया..! जीवघेण्या दहशतवादी हल्ल्यानंतर पहलगामला पोहोचला मराठमोळा अभिनेता, फोटो व्हायरल

Atul Kulkarni । Pahalgam attack – पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा पर्यटन उद्योगावर खोलवर परिणाम झाला आहे. हल्ल्यानंतर लगेचच पर्यटकांनी त्यांचे ९० टक्के बुकिंग रद्द केल्याचे राजधानीतील बहुतेक टूर आणि ट्रॅव्हल एजन्सींचे म्हणणे आहे. हीच पद्धत अशीच सुरू राहील अशी भीती आहे. येत्या काही दिवसांत आणखी बुकिंग रद्द होऊ शकतात.
नवीन बुकिंगसाठीही कोणतीही चौकशी नाही. त्याचबरोबर, दहशतवादी हल्ला हा परदेशी पर्यटकांसाठीही चिंतेचा विषय बनला आहे. परदेशी पर्यटक टूर ऑपरेटर्सकडे सतत चौकशी करत असतात. अनेक परदेशी पर्यटकांनी काश्मीरमध्ये त्यांचे बुकिंग रद्द केले आहे. लोकांच्या मनात तिथे जाण्यासाठी भीतीचं वातावरण आहे.
तिच भीती घालवण्यासाठी एक अभिनेता थेट काश्मीरला गेला आहे. होय, मराठी आणि हिंदी चित्रपट इंडस्ट्रीतील सुप्रसिद्ध अभिनेते ‘अतुल कुलकर्णी’ काश्मीरला गेले आहेत. स्वतः त्यांनी सोशल मीडियावर तिकिटाचा फोटो शेअर केला आहे. हल्ल्याच्या आठवडाभरानंतरच अतुल कुलकर्णी यांनी खरोखरचं धाडस दाखवत काश्मीरला जाऊन लोकांच्या मनातील भीती काढण्याचा प्रयत्न केला.
#ChaloKashmir #Feet_in_Kashmir #Kashmiriyat #love_compassion #DefeatTerror pic.twitter.com/nOe7zG8FWj
— atul kulkarni (@atul_kulkarni) April 27, 2025
त्यांनी काश्मीरला जाताना विमान प्रवासापासून ते तिथे पोहोचल्यावर तिथल्या परिस्थितीचे सर्व अपडेट लोकांपर्यंत पोहोचवले आहेत. त्यांनी हे सर्व फोटो त्यांच्या सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. अतुल कुलकर्णीने X वर एक पोस्ट शेअर केली आहे.
चलिए जी कश्मीर चलें
सिंधु, झेलम किनार चलें
कश्मीरियत की बात सुनें
कश्मीरियों की बात बनें
चलिए जी, कश्मीर चलें pic.twitter.com/eVpJSVJGTy— atul kulkarni (@atul_kulkarni) April 27, 2025
त्यांनी विमानाच्या तिकिटांचा फोटो शेअर केला आहे. या पोस्टला त्याने कॅप्शन दिले आहे, ‘मुंबई ते श्रीनगर, काश्मीर.’ सध्या अभिनेत्याची ही पोस्ट सोशलवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून नेटकरी देखील यावर कमेंट करत आहेत.
‘अतुल’निय अभिनेता अतुल कुलकर्णी….
आज मराठी-हिंदी चित्रपटसृष्टीतील एक मराठमोळ प्रसिद्ध नाव म्हणजे ‘अतुल कुलकर्णी’ आहे. 10 सप्टेंबर1965 रोजी बेळगावमध्ये जन्मलेल्या अतुल यांनी दहावीपर्यंतचे शिक्षण सोलापूर येथील हरिभाई देवकरण हायस्कूलमध्ये पूर्ण केलं.
त्यानंतर अभिनयाची आवड असल्यामुळे 1992 मध्ये अतुलने नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा, नवी दिल्ली मध्ये प्रवेश घेतला. तिथे अतुल त्याने पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन ड्रॅमाटीक आर्ट्स ही पदवी मिळवली.
नटरंग’, ‘वळू’, ‘चांदनी बार’, ‘हे राम’ सारख्या चित्रपटातून आपल्या अभिनयाने अतुल कुलकर्णी याने राष्ट्रीय पुरस्कारावर आपले नाव कोरले आहे. एवढेच नव्हे तर बॉलिवूड अभिनेता आमिर खानच्या आगामी ‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटाचे लेखन सुद्धा अतुलने केले आहे.





