आळंदी -पुत्रदा एकादशी असल्याने बुधवारी (दि. 18) माऊली मंदिरात आळंदीसह जिल्ह्यातून माऊलींच्या संजीवन समाधीचे मुखदर्शन घेण्यासाठी तसेच इंद्रायणी नदीत स्नान करण्यासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. दरम्यान, संजीवन समाधीसह मंदिराचा गाभारा सुवासिक फुलांनी सजवण्यात आला होता.
आज पहाटे पवमान अभिषेक इतर धार्मिक कार्यक्रम दुपारी साडेबारा वाजता श्री ना नेवैद्य देण्यात आला भजन कीर्तन प्रवचन असे रात्री उशिरापर्यंत धार्मिक कार्यक्रम माऊली मंदिरात पार पडले.
रांजणगाव गणपती येथील पाचुंदरकर परिवार हे नेहमीच माऊलींच्या संजीवन समाधीवर सुंदर,आकर्षषक, मनमोहक अशी सजावट स्वखर्चाने करीत असतात, त्याचप्रमाणे आजही केली होती. तर दिवसभर माऊली मंदिर परिसरासह अलंकापुरी नगरित भाविकांची गर्दी झाली होती, अशी माहिती मंदिराचे सरव्यवस्थापक माऊली वीर यांनी सांगितले.