HSRP Number Plate : पुणेकरांनो लक्ष द्या! ३० एप्रिलपर्यंत HSRP नंबर प्लेट बसवा, अन्यथा….; आरटीओने दिला ‘हा’ इशारा

पुणेः राज्य परिवहन विभागाने ‘हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट’ अर्थात एचएसआरपी नंबर प्लेट 2019 च्या पूर्वीच्या वाहनांना बसवण्यासाठी एका महिन्याची मुदतवाढ जाहीर केली आहे. त्यानुसार आता वाहनचालकांना 30 एप्रिलपर्यंत ही नंबरप्लेट बसविणे बंधनकारक करण्यात आले आहे. या तारखेआधी एचएसआरपी नंबरप्लेट बसवलेली नसल्यास आरटीओ विभागाकडून कारवाई केली जाणार आहे.
सुरूवातीला यासाठी ३१ मार्चपर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र, आता या मुदतीमध्ये एका महिन्याची वाढ करण्यात आली आहे. 2019 पूर्वीच्या पुणे प्रादेशिक परिवहन विभागात जवळपास 25 लाख वाहने आहेत. त्यामुळे परिवहन विभागाने ही नंबरप्लेट बसवण्यासाठी मुदतवाढ द्यावी, अशी मागणी केली जात होती. त्यानुसार यात वाढ करण्यात आली आहे.
एचएसआरपी नंबर प्लेट बसवण्यासाठी एका कंपनीला यासंबंधीचे सर्व काम देण्यात आले आहे. 2019 पूर्वीच्या एचएसआरपी नंबर प्लेट बसवण्याचे आदेश आरटीओंनी काढले आहेत. ही नंबर प्लेट बसवायला सुरूवात झाली असून, वाहनधारकांकडून याला कमी प्रतिसाद मिळताना दिसत आहे.
आतार्यंत १० हजार वाहनांना एचएसआरपी नंबर प्लेट
आता 30 एप्रिलनंतर हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट नसेल्यास अशा वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. यामुळे लवकरात लवकर नंबर प्लेट बसवून घ्याव्यात, असे आवाहन आरटीओकडून करण्यात आले आहे. पुण्यात 2019 पूर्वीची 25 लाख वाहने आहेत. पैकी केवळ 10 हजार वाहनांना एचएसआरपी नंबर प्लेट बसवले असून 25 लाख वाहनांवर एचएसआरपी नंबर प्लेट बसवणे बाकी आहेत.
अशी रक्कम द्यावी भरावी लागणार
टू व्हिलर आणि ट्रॅक्टरसाठी 450 रुपये + जीएसटी
थ्री व्हीलरसाठी 500 रुपये + जीएसटी
फोर व्हीलर आणि इतर वाहनांसाठी 745 रुपये + जीएसटी
या संकेतस्थळावर नोंदणी करू शकता
transport.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरून ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करावी लागेल. यानंतर फिटमेंट सेंटरची लिस्ट सिलेक्ट करावी लागेल. या लिस्टमध्ये तुमच्या जवळच्या सेंटरचे नावाची निवड करावी लागेल. त्यानंतर तुम्हाला मिळालेल्या तारखेच्या दिवशी फिटमेंट सेंटरला जावे लागेल आणि तिथे गेल्यावर वेंडर आपल्या वाहनाला नंबर प्लेट बसवून देईल. त्याची नोंद वेंडर वाहन प्रमाणीत करेल.
हे आहेत फायदे
- या प्लेटमुळे अधिकाऱ्यांना वाहनाची सत्यता शोधता येते.
- या प्लेटमुळे वाहन चोरीचा धोका कमी होतो.
- या प्लेटमुळे वाहनाशी संबंधित फसवणुकीला आळा बसतो.
- या प्लेटमध्ये लेझर-कोरीव कोड असतो जो ट्रॅकिंग आणि सत्यापनात मदत करतो.
- या प्लेटमध्ये न काढता येण्याजोगे स्नॅप लॉक असते.





