गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर जालन्यात हल्ल्याचा प्रयत्न; धनगर आंदोलकांच्या भेटीसाठी जाताना घडली घटना

Gunaratna Sadavarte | जालनामध्ये वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. सदावर्ते हे जालना शहरात धनगर आंदोलकांच्या भेटीसाठी आले होते. त्यादरम्यान काही मराठा बांधवांनी त्यांच्या गाडीवर हल्ला केला.
धनगर समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश व्हावा, या मागणीसाठी काही जण जालना शहरात उपोषण करत आहेत. येथील उपोषणकर्त्यांना भेट देण्यासाठी सदावर्ते चालले होते. याचवेळी काही मराठा बांधवांनी त्यांचे वाहन अडविण्याचा प्रयत्न केला.
पोलिसांचा ठिकठिकाणी बंदोबस्त तैनात
दरम्यान, पोलिसांनी सदावर्ते यांच्या जाण्याच्या मार्गावर ठिकठिकाणी बंदोबस्तही तैनात केला होता. तरी देखील एकाठिकाणी सदावर्ते यांचे वाहन येताच काही मराठा बांधवांनी पोलिसांची नजर चुकवून हल्ल्याचा प्रयत्न केला. वाहनाच्या काचांवर त्यांनी हाताने जोरदार प्रहार केले. अचानक हल्ल्याचा प्रयत्न झाल्याने पोलिसांचीही तारांबळ उडाली.
त्यानंतर पोलिसांनी तातडीने कार्यकर्त्यांना पकडले आणि वाहनाला वाट मोकळी करून दिली. पोलिसांच्या सतर्कतेमुळे पुढे होणार गोंधळ वेळीच थांबला गेला. Gunaratna Sadavarte |
दरम्यान, मुंबईतील मनोज जरांगे यांच्या आंदोलनाविरोधात सदावर्ते यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती. याशिवाय जरांगे यांना डिवचणारी अनेक विधानेही त्यांनी केली होती. Gunaratna Sadavarte |
हेही वाचा:
अभिनेत्री करिना कपूर स्वत:चे सिनेमे का पाहत नाही; सांगितलं त्यामागचं मोठं कारण म्हणाली…





