Satara | रिक्षा भाड्याच्या कारणातून युवकावर हल्ला

सातारा, (प्रतिनिधी) – रिक्षा भाड्याच्या कारणातून अजय राहुल नलवडे (वय 17, रा. विलासपूर, सातारा) याच्यावर तलवार, हॉकी स्टिकने हल्ला केल्याप्रकरणी ओंकार शिवदास, सूरज उंबरकर व नरेश सुनर यांच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना शनिवारी (दि. 13) विलासपूर येथे घडल्याचे अजय नलवडे याने तक्रारीत म्हटले आहे.
एमआयडीसीतून चंदनाच्या झाडाची चोरी
सातारा, औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीच्या आवारातून चोरट्याने 20 हजार रुपये किमतीचे, दहा इंच घेराचे चंदनाचे झाड चोरून नेल्याची फिर्याद वॉचमन मिलिंद दादासाहेब केंजळे (वय 55) यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात दिली आहे. ही चोरी रविवारी (दि. 14) झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
अपघातप्रकरणी एकावर गुन्हा
सातारा, वाढे, ता. सातारा गावच्या हद्दीत अपघात करून, दिनेश शिंदे यांना जखमी केल्याप्रकरणी बापूसाहेब पांडुरंग चव्हाण (वय 48, रा. कोंबडवाडी, पो. आर्वी, ता. कोरेगाव) याच्यावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना गुरुवारी (दि. 11) घडली. याप्रकरणी सारंग दिनेेश शिंदे (वय 30, रा. सदरबझार, सातारा) यांनी तक्रार दिली आहे.





