Anil Deshmukh : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; काटोल रुग्णालयात उपचार सुरु
Updated On:

नागपूर : राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गाडीवर अज्ञात हल्लेखोरांकडून हल्ला करण्यात आला आहे. हल्लेखोरांनी त्यांच्या गाडीवर दगडफेक केली. या घटनेमध्ये ते गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी काटोलच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
काय घडले नेमके?
नरखेड येथील सांगता सभा आटोपून माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे काटोल येथे तीनखेडा भिष्णुर मार्गाने परत येत होते. अचानक काटोल जलालखेडा रोडवरील बेलफाट्याजवळ काही लोकांनी त्यांच्या गाडीवर मोठ्या प्रमाणात दगडफेक केली. यामध्ये ते गंभीर जखमी झाले आहेत. हा हल्ला का आणि कोणत्या कारणामुळे करण्यात आला? हे अद्याप समोर आलेले नाही.






