अतिक अहमदची पत्नी शाईस्ता परवीनला ‘या’ पक्षाकडून उमेदवारीची ऑफर?

बलिया (उत्तर प्रदेश) – नुकत्याच झालेल्या गोळीबारात ठार झालेला अतिक अहमद याची पत्नी शाईस्ता परवीन हिने प्रयागराजच्या महापौर पदाची निवडणूक लढवावी, अशी सुचना बहुजन समाज पक्षाचे आमदार उमाशंकर सिंह यांनी केली आहे.
बहुजन समाज पक्षाने अधिकृतपणे त्यांना अशी अद्याप ऑफर दिलेली नाही, पण त्यांच्याच पक्षाच्या एका जबाबदार आमदाराने जाहीरपणे ही सुचना केल्याने ही पक्षातर्फेच दिली गेलेली ऑफर आहे असा अन्वयार्थ लावला जात आहे. उमाशंकरसिंह म्हणाले की, बसपा नेते राजू पाल यांच्या हत्येतील प्रमुख साक्षीदार उमेश पाल यांच्या हत्येप्रकरणी शाइस्ता परवीन यांचे नाव संशयित म्हणून पोलिसांनी घातलेले नाही.
आम्ही शाइस्ता परवीनला पक्षात सामील करून घ्यावे आणि तिला महापौरपदाच्या निवडणुकीत उमेदवारी द्यावी अशी आमची इच्छा आहे असे ते म्हणाले.
ज्या दिवशी शाईस्ता या खटल्याशी जोडली जाईल, त्या दिवशी पक्ष तिच्याशी असलेले सर्व संबंध तोडेल, असे ते म्हणाले. शाईस्ता परवीन या अजूनही बसपामध्येच आहेत, तिच्यावर पक्षाने अजून कोणतीही कारवाई केलेली नाही असेही त्यांनी निदर्शनाला आणून दिले.या महिन्याच्या सुरुवातीला उत्तर प्रदेश पोलिसांनी कौशांबीमध्ये शाइस्ता परवीनच्या शोधात छापे टाकले होते.





