रिक्षावाल्यांसोबत जेवली, रस्त्यावर राहिली…; अन् एका रात्रीच कोट्यवधींची अभिनेत्री आली रस्त्यावर

Rashami Desai : भोजपुरी फिल्म इंडस्ट्रीमधून आपल्या करिअरची सुरुवात करणारी अभिनेत्री ‘रश्मी देसाई’ आज यशाच्या उंच शिखरावर आहे. आज तिला कोणत्याही ओळखीची गरज नाही. रश्मी देसाई हिंदी टेलिव्हिजनच्या सुपर नॅचरल शो नागिनच्या सीझन 6 मध्ये देखील दिसली होती. अभिनेत्री रश्मी देसाई टेलिव्हिजन स्टार म्हणून घराघरात प्रसिद्ध आहे.
टीव्ही इंडस्ट्रीत अनेक अभिनेत्री आल्या आणि गेल्या. खूप कमी अभिनेत्री आहेत ज्यांनी आपले आकर्षण आणि स्टारडम टिकवून ठेवले आहे, त्यापैकी एक म्हणजे ‘रश्मी देसाई’. अभिनेत्रीला ‘उत्तरन’ मालिकेतून खरी लोकप्रियता मिळाली होती. आणि ती रातोरात स्टार झाली. पण काही कालावधीनंतर ही मालिका देखील बंद झाली त्यानंतर अभिनेत्रीला मानसिक आणि आर्थिक संकटांचा सामना करावा लागला होता. असं जीवन जगण्यापेक्षा मरणे चांगले होईल. असं देखील तिला या काळात वाटत होते.
नुकतंच दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, ‘मी एक घर विकत घेतले होते आणि माझ्यावर 2.5 कोटी रुपयांचे कर्ज होते. त्याशिवाय मला आठवते की माझ्यावर एकूण 3.25 ते 3.5 कोटी रुपयांचे कर्ज होते, मला वाटले सर्व काही ठीक आहे, सामान्य आहे… माझा शो अचानक बंद झाला. मी चार दिवस रस्त्यावर राहिले.
माझ्याकडे ऑडी A6 होती ज्यामध्ये मी झोपायचे. मी सामान ठेवले होते. माझं घर आणि मी माझ्या कुटुंबापासून स्वतःला पूर्णपणे दूर केले. तिला रिक्षावाल्यांकडून फक्त 20 रुपयांचे अन्न खावे लागे, कधीकधी जेवणात खडेही मिळायचे. ते चार दिवस माझ्या आयुष्यात खूप कठीण होते. मी सगळ्या गोष्टींमध्ये इतकी अडकले की मी स्वतःलाच विसरले. मला वाटायचे, हे कसले जीवन आहे? मरणे चांगले होईल.
मात्र, नंतर बराच वेळ तणावाखाली राहिल्यानंतर मी स्वत:वर काम केले आणि स्वत:ला या गोष्टीतून मोकळे केले’. असं देखील अभिनेत्रीने यावेळी सांगितलं. सध्या रश्मी देसाई ही एक सोशल मीडिया क्वीन आहे, जिने भोजपुरी सिनेमापासून छोट्या पडद्यापर्यंत लाखो चाहत्यांच्या हृदयात आपली छाप सोडली आहे. आज तिचा सोशल मीडियावर लाखोंच्या घरात चाहता वर्ग आहे. रश्मी आज अनेक नवीन मालिका रियालिटी शो मध्ये देखील दिसून येते.





