Nandish Sandhu: वयाच्या ४४ व्या वर्षी नंदिश संधूने बांधली दुसऱ्यांदा लग्नगाठ; विवाहाचे फोटो व्हायरल
Nandish Sandhu: नंदिश संधूने पहिले अभिनेत्री रश्मी देसाईबरोबर लग्न केले होते.

Nandish Sandhu: ‘उतरन’ या मालिकेतून लोकप्रिय झालेला अभिनेता नंदिश संधूने दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधली आहे. वयाच्या ४४ व्या वर्षी तो पुन्हा एकदा बोहल्यावर चढला आहे. त्याने १४ नोव्हेंबर २०२६ रोजी मैत्रीण कविता बॅनर्जीसोबत लग्न केलं. याआधी त्याचे लग्न टीव्ही अभिनेत्री रश्मी देसाईसोबत झाले होते.
सध्या नंदिश व कविता यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये ते पारंपरिक पेहरावात दिसत आहेत. तसेच, विविध विधींचे फोटोही पाहायला मिळत आहेत. गेल्या वर्षी म्हणजेच ऑक्टोबर २०२५मध्ये साखरपुडा केला होता.
दरम्यान, नंदिश संधूने अभिनेत्री रश्मी देसाईबरोबर लग्न केले होते. उतरन या मालिकेच्या सेटवर त्यांची भेट झाली होती. त्यानंतर त्यांनी १२ फेब्रुवारी २०१२ ला लग्नगाठ बांधली. मात्र, त्यांचे हे लग्न फार काळ टिकू शकले नाही. २०१६मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला.
नंदिशबरोबर झालेल्या घटस्फोटानंतर रश्मी सिंगल आहे. तर नंदिशने दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधली आहे. नंदिशची दुसरी पत्नी कविता बॅनर्जी देखील अभिनय क्षेत्रात काम करते. तिने आतापर्यंत हिंदी मालिका, वेब सीरिज आणि सिनेमांमध्ये काम केले आहे.
हेही वाचा:





