राजगुरूनगर येथे कपाट उचकटून बारा तोळे सोने लंपास
Updated On:

पुणे : राजगुरूनगर शहरातील एका बंगल्यात अज्ञात चोरट्यानी सुमारे बारा तोळे सोन्यावर डल्ला मारला. हि घटना सोमवारी पहाटे तीनच्या दरम्यान घडली.
रामदास तुकाराम लोहकरे श्री समर्थ बंगल्यात झोपले असता रात्री एक ते तीन वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी बंगल्यात केला.
बेडरूममध्ये असलेले कपाट उचकटून चोरटयांनी त्यातील सुमारे बारा तोळे सोन्याचे दागिने लंपास केले.
लोहकरे सकाळी उठल्यानंतर त्यांना दागिने ठेवलेले बॉक्स अस्ताव्यस्त पडलेले दिसल्यानंतर त्यांनी चोरी झाल्याची माहिती खेड पोलिसांना दिली.
घटनेची तात्काळ दाखल घेत पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. अधिक तपास खेड पोलीस ठाण्याचे पोलीस करीत आहेत.





