Pune District : गुंठेधाराकांना बोअरवेल घेण्यास बंदी

रांजणगाव गणपती : शिरूर तालुक्यातील बाभूळसर खुर्द येथे भविष्यातील शेतीच्या पाण्याचा विचार करून गावातील गुंठेधारकांनी कुपनलिका घेऊ नयेत व कुपनलिका घेण्यावरती बंदी आणावी, अशी मागणी ग्रामसभेत करण्यात आली व याबाबत ठराव संमत करण्यात आला.
सरपंच सोनाली दशरथ फंड यांच्या अध्यक्षतेखाली यांच्या अध्यक्षते खाली घेण्यात आलेल्या ग्रामसभेत हा ठराव घेण्यात आला. रांजणगाव औद्योगिक वसाहतीच्या लगत असलेल्या बाभूळसर खुर्द गावात मोठ्या प्रमाणावर गुंठेवारी व्यवसाय सुरु आहेत व गुंठेवारी करताना 1 एकराला 25 ते 30 बोअरवेल घेतले जात आहेत. त्याचा परिणाम शेतीच्या पाण्यावरती होऊ लागला. गावातील कुपनलिकांचे प्रमाण वाढल्यामुळे अनेक शेतकर्यांच्या शेतातील विहिरीचे पाणी कमी होऊ लागले.
त्यामुळे ग्रामस्थांनी एकमताने मागणी केली गेली की, गावातील गुंठेधारक घेत असलेले बोअरवेल बंद करावेत. कारण जर आज प्रत्येक जण असे कुपनलिका घेत गेले तर गावातील शेतकर्यांचे फार मोठे हाल होतील व गावातील पाण्याची पातळी खोलवर जावून शेतकर्यांचे विहिरींचे पाणी सुद्धा जाईल. व परिणामी शेतकरी वर्ग अडचणीत येईल. त्यामुळे ग्रामसभेत सर्वानुमते गावातील गुंठेधारक घेत असलेले कुपनलीकेसाठी बंदी करण्याचे असे सर्वानुमते ठरले. व यापुढे कोणीही कुपनलिका घेवू नये असे आवाहन ग्रामसभेत सर्वानुमते व एकमताने करण्यात आले. व याबाबत वरिष्ठ कार्यालयाकडून मार्गदर्शन घेण्यात येईल असे ग्रामसेवक सचिन चव्हाण यांनी सांगितले.
ग्रामसभेत बोअरवेल बंदी करण्याचे सर्वानुमते ठरले व तसा ठरावही संमत करण्यात आला असल्याचे उपसरपंच शेखर डाळिंबकर यांनी सांगितले. या ठरावासाठी सचिन भागचंद सुपेकर, सूचक तर विकास गजानन शिदे अनुमोदक म्हणून काम पाहिले व ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. याप्रसंगी गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.





