सर्वपक्षीय आमदारांच्या स्वीय सहाय्यकांकडून मुख्यमंत्री सहायता निधीसाठी मदत
Updated On:

मुंबई : सर्वपक्षीय आमदारांच्या स्वीय सहाय्यकांतर्फे कोविड संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री सहायता निधी (कोविड 19) करिता आज 3 लाख 37 हजार 240 रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.
या मदतीच्या रुपाने स्वीय सहाय्यकांनी सामाजिक बांधिलकी जपत कोविड 19 विरुद्धच्या लढाईत योगदान देण्याचा प्रयत्न केला आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांनी या मदतीसाठी सर्वपक्षीय आमदारांच्या स्वीय सहाय्यकांना धन्यवाद दिले आहेत.





