पुणे जिल्हा | विधानसभा निवडणुका नोव्हेंबरपर्यंत

यवत,(वार्ताहर)- महाविकास आघाडीचा सर्व्हे चालू असून तो पूर्ण झाल्यानंतरच कोणत्या मतदारसंघात आघाडीतील पक्षाला किती जागा मिळतील, यानंतरच उमेदवार निश्चित केले जातील.
हे कामकाज दि. १ सप्टेंबरपूर्वी पूर्ण व्हावे असा आमचा प्रयत्न राहील. साधारण विधानसभेची निवडणूक नोव्हेंबरच्या १५ तारखेपर्यंत होऊ शकते, असे संकेत खासदार सुप्रिया सुळे यांनी दिले.
दौंड तालुक्यातील यवत येथील समृद्धी मंगल कार्यालय येथे यवत पंचायत समिती गणातील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा व बुथ कमिटी बैठक खासदार सुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. त्यावेळी त्या बोलत होत्या.
यावेळी खासदार सुळे यांचा सहकाऱ्यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजक राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने केले होते.
लोकसभा निवडणुकीनंतर प्रथमच यवत येथे गट- गणातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा व बुथ कमिटींचे एकत्रित आयोजन केले होते.
यावेळी पंचक्रोशीतील कार्यकर्ते, नागरिकांनी वैयक्तिक व सार्वजनिक अडीअडचणींबाबत निवेदने सुळे यांच्या पुढे मांडल्या. यावर चर्चा करून त्या सोडविण्यासंदर्भात देखील आश्वासन देण्यात आले.
सुळे म्हणाल्या की, दौंड तालुका ग्रामीण भागातील सर्वांगीण विकास व्हावा याबाबत कटिबद्ध आहे. शेतीमालाला हमीभाव, दुधाला बाजारभाव,
यवत पोलीस ठाण्याबाबत तर गाव व वाडी वस्त्या, शेत रस्त्याबाबत प्रश्न, राष्ट्रीय महामार्गचा सर्वात महत्त्वाचा विषय असून याबाबत पुढील आठवड्यात संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेणार आहे. आपण सर्वांनी योग्य तो मार्ग काढू.
यावेळी पदाधिकाऱ्यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष आप्पासाहेब पवार, सोहेल भाई खान,नामदेव ताकवणे,रामभाऊ टुले,
अजित शितोळे, सचिन काळभोर, चैतन्य पाटोळे, आनंद शेलार, दिग्विजय जेधे, आघाडीतील मित्रपक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.





