विधानसभा निवडणुकीच्या निकालाचे सुरूवातीचे कल येण्यास सुरुवात; अब्दुल सत्तार, तानाजी सावंतसह दिग्गज नेतेमंडळी पिछाडीवर

Maharashtra Assembly Election 2024 | विधानसभा निवडणुकीच्या निकालाचे सुरूवातीचे कल हाती आलेले आहेत. यात महायुतीमध्ये भाजपने जोरदार मुसंडी मारली आहे. भाजप ९२ जागांवर आघाडीवर आहे, तर शिंदेंची सेना २८ जागांवर आघाडीवर आहे. अजित पवारांची राष्ट्रवादीचे उमेदवार २५ जागांवर आघाडीवर आहेत. तर मविआमध्ये शरद पवार आणि उद्धव ठाकरेंच्या पक्षाची सुरुवात संथ झाली आहे. राज्यातील दिग्गज नेते मंडळी पिछाडीवर असल्याचे पाहायला मिळत आहे.
अब्दुल सत्तार, तानाजी सावंत पिछाडीवर
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत हे परंडा- विधानसभा मतदारसंघात दुसऱ्या फेरीअखेर महायुतीचे तानाजी सावंत 529 मतांनी पिछाडीवर आहेत. शरद पवार गटाचे राहुल मोटे यांनी आघाडी घेतली आहे. तर अब्दुल सत्तार सिल्लोडमधून जवळपास तीन हजार मतांनी पिछाडीवर आहेत.
छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड विधानसभा मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना अशीच लढत आहे. निवडणूक आयोगाच्या मतमोजणीचा पहिल्या कलानुसार सिल्लोड मतदारसंघात अब्दुल सत्तार पिछाडीवर आहेत. याशिवाय युगेंद्र पवार, युगेंद्र पवार, बाळासाहेब थोरात, बच्चू कडू आणि राधाकृष्ण विखे पाटील ही नेते मंडळी देखील पिछाडीवर आहेत.
बाळासाहेब थोरात पिछाडीवर
संगमनेरमधून बाळासेहब थोरात पिछाडीवर आहेत. बाळासाहेब थोरात यांना टपाली मतपत्रिकेत आघाडी मिळाली होती. पण ईव्हीएम मशीनमून मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर बाळासाहेब थोरात पिछाडीवर पडले आहेत. तिसऱ्या फेरीनंतर बाळासाहेब थोरात सहा हजार मतांनी पिछाडीवर आहेत.
माहीम
माहीमची तिरंगी लढत चुरशीची झाली आहे. सुरुवातीला मनसेच्या अमित ठाकरे यांनी आघाडी घेतल्यानंतर आता महाविकास आघाडीचे महेश सावंत आघाडीवर आहे. साडेनऊ वाजता ठाकरेंचे महेश सावंत यांनी मोठी आघाडी घेतली आहे. शिंदेंचे सरवणकर तिसऱ्या क्रमांकावर आहेत.
अमरावती
पहिल्या फेरीत अमरावतीच्या अचलपूरमधून प्रहारचे उमेदवार बच्चू कडू पिछाडीवर आहेत. भाजपचे प्रविण तायडे 1401 मतांनी आघाडी घेतली.
बारामती
बारामतीमध्ये काका पुतण्याच्या लढतीत सुरुवातीच्या कलात काकांनी आघाडी घेतली आहे. पहिल्या फेरीनंतर अजित पवार यांनी मोठी आघाडी घेतली आहे. युगेंद्र पवार पिछाडीवर आहेत. टपाली मतमोजणीत युगेंद्र पवार यांनी आघाडी घेतली होती. पण ईव्हीएम मतमोजणी सुरु झाल्यानंतर पहिल्याच फेरीत अजित पवार यांनी आघाडी घेतली.




