Assembly Election Results 2022: आशिष शेलार म्हणाले,”शिवाजी पार्कमध्ये युवराज हत्तीवरून साखरसुद्धा वाटतील”;

मुंबई : उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूर या पाचही राज्यांमध्ये चुरशीने लढल्या गेलेल्या विधानसभा निवडणुकांची मतमोजणी सुरू असून पंजाब वगळता चार राज्यांमध्ये भाजपा सत्तेवर येण्याची चित्र स्पष्ट दिसत आहे. यामधील सर्वाधिक लक्ष हे उत्तर प्रदेशच्या निकालाकडे लागले होते आणि इथे भाजपा पुन्हा एकदा सत्तेत येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, पंजाबमधील जनतेने प्रस्थापितांना डावलून आम आदमी पक्षाला संधी दिली आहे.
देशातील पाच राज्यांच्या निवडणूक निकालावर आता राज्यातील प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. त्यात भाजपचे नेते आशिष शेलार यांनी गोवा आणि युपीत शिवसेनेचा पराभव झाल्यानंतर ट्वीट करत टोला लगावला आहे. “अरविंद केजरीवालांचा आता बहुतेक शिवसेना भवनात जंगी सत्कार होईल.. शिवाजी पार्कमध्ये हत्तीवरून युवराज साखर सुध्दा वाटतील… शेजाऱ्यांच्या घरात पाळणा हलला की, पेढे वाटपाचे कार्यक्रम करुन दाखवले जातात,” असा टोला आशिष शेलार यांनी लगावला आहे.
-इसवीसन 2024 साली दिल्लीच्या खुर्चीत बसणार…
-उत्तर प्रदेश, गोव्यात बघा आम्ही करुन दाखवतो..
-उत्तर प्रदेशात युवराजांची अती विराट सभा…झंझावाती दौरा…सगळ्या बुडबुड्यांचे निकाल लागले…अती प्रचंड मतांनी झंझावाती डिपॉझिट गुल
हारले..
“एक मासो आणि खंडी भर रस्सो!”
1/2— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) March 10, 2022
“इसवीसन 2024 साली दिल्लीच्या खुर्चीत बसणार, उत्तर प्रदेश, गोव्यात बघा आम्ही करुन दाखवतो, उत्तर प्रदेशात युवराजांची अती विराट सभा…झंझावाती दौरा…सगळ्या बुडबुड्यांचे निकाल लागले…अती प्रचंड मतांनी झंझावाती डिपॉझिट गुल…हारले..“एक मासो आणि खंडी भर रस्सो!”, असेही ते म्हणाले आहेत.





