‘खतरों के खिलाडी 14’मधून आऊट झाल्यानंतर असीम रियाजची पहिली पोस्ट

Entertainment | छोट्या पडद्यावरील सर्वात लोकप्रिय शो असलेला म्हणजे ‘खतरों के खिलाडी’. सध्या या शोचे 14 वे पर्व सुरू आहे. नुकतेच असीम या शोमधून बाहेर पडला आहे. मात्र त्याला रोहित शेट्टीचा शो सोडण्यास का सांगण्यात आले याबद्दल कोणतेही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. असीम रियाझनेही त्याच्या हकालपट्टीवर मौन पाळले आहे. यानंतर आता त्याने इनस्टाग्रामवर शेअर केलेली पोस्ट चर्चेत आली आहे.
‘खतरों के खिलाडी 14’मधून बाहेर पडल्यानंतर असीम रियाझने पहिली पोस्ट शेअर केली आहे. त्याचे अनेक फोटो त्याने इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये असीमने लिहिले, ’12 साल..!!’, दरम्यान, ’12 साल’ हा असीम रियाझचा आगामी म्युझिक व्हिडिओ आहे. जो 5 जून 2024 रोजी रिलीज होण्यासाठी सज्ज आहे. असीमच्या या पोस्टवर चाहतेही भरभरून प्रतिक्रिया देत आहेत.
असीम रियाझच्या पोस्टवर कमेंट करताना एका चाहत्याने लिहिले – ‘असिमला बाहेर फेकले गेले आहे, आता शो कोण पाहणार?’, तर दुसऱ्या एका चाहत्याने लिहिले की, ‘भाई, तुम्ही तुमचा राग थोडा नियंत्रित करायला हवा होता. समोर आलेल्या माहितीनुसार, असीम एक स्टंट गमावला आणि त्यानंतर त्याचा रोहित शेट्टीसोबत वाद झाला. यानंतर रॅपरला बाहेर काढण्यात आल्याचे म्हंटले जात आहे.
दरम्यान, आसिम रियाझ ‘खतरों के खिलाडी 14’ चा पहिला कन्फर्म झालेला स्पर्धक होता. असीम रियाझ व्यतिरिक्त ‘खतरों के खिलाडी 14’ मध्ये अभिषेक कुमार, शालीन भानोत, अदिती शर्मा, गश्मीर महाजनी, करण वीर मेहरा, शिल्पा शिंदे, सुमोना चक्रवर्ती, निमृत कौर अहलुवालिया, कृष्णा श्रॉफ, आशिष मेहरोत्रा आणि नियति फतनानी या कलाकारांचा समावेश आहे.





