“जर तुम्ही पुन्हा हल्ला केला तर…” ; पाकच्या लष्कर प्रमुखांची भारताला धमकी

Asim Munir on India। पाकिस्तान अनेकदा भारताविरुद्ध दहशतवादी कट रचत असतो. पहलगाम दहशतवादी हल्ल्यात २६ जणांना आपले प्राण गमवावे लागले. भारताने ऑपरेशन सिंदूरने याचा बदला घेतला. पाक लष्करप्रमुख असीम मुनीर यांनी यापूर्वी आणि नंतरही भारताविरुद्ध विष ओकले आहे. आता त्यांनी जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी घटनांना समर्थन दिले आहे. मुनीर यांनी पुन्हा एकदा भडकावू भाषण दिले आहे.
असीम मुनीर कराची याठिकणी पाकिस्तानी नौदल अकादमीमध्ये आयोजित पासिंग आउट परेडमध्ये सहभागी होण्यासाठी आले होते. येथे भाषणादरम्यान त्यांनी सांगितले की पाकिस्तान नेहमीच काश्मिरींच्या पाठीशी उभा राहील. मुनीर म्हणाले की जर भारताने हल्ला केला तर पाकिस्तान देखील प्रत्युत्तर देईल. यादरम्यान मुनीर यांनी भारत आणि काश्मीरबद्दल अनेक भडकावू गोष्टी देखील सांगितल्या.
मुनीर यांनी काश्मीर आणि दहशतवादाबद्दल काय म्हटले? Asim Munir on India।
एका इंग्रजी वर्तमानपत्राच्या वृत्तानुसार असीम मुनीर यांनी, “भारत ज्याला दहशतवाद म्हणतो तो एक वैध संघर्ष आहे. पाकिस्तान नेहमीच काश्मीरला मदत करेल.” असे त्यांनी म्हटले आहे. मुनीर एवढ्यावरच थांबले नाहीत. ते म्हणाले, “जर भारताने भविष्यात हल्ला केला तर पाकिस्तानही प्रत्युत्तर देईल. आम्ही हे दोनदा केले आहे. प्रथम आम्ही २०१९ मध्ये बालाकोट हवाई हल्ला उधळून लावला आणि आता ऑपरेशन सिंदूर.”
भारत आणि पाकिस्तानमधील तणाव Asim Munir on India।
भारताने ऑपरेशन सिंदूरद्वारे पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर दिले होते. त्यात शंभराहून अधिक दहशतवादी मारले गेले होते. या काळात पाकिस्तानी सैन्याने अनेक भारतीय शहरांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर सैन्याने पाकिस्तानचे मोठे नुकसान केले. पाकिस्तानच्या अनेक लष्करी तळांवर प्रत्युत्तरात्मक कारवाई करण्यात आली. तथापि, यानंतर दोन्ही देशांमध्ये युद्धबंदी झाली. भारतीय नौदल देखील पाकिस्तानचे मोठे नुकसान करणार होते, असे एका वृत्तानुसार, नौदलाने लक्ष्य निश्चित केले होते, परंतु त्यांना आदेश देण्यात आले नव्हते.





