Asian Para Games 2023 (shot put) : पुण्याच्या सचिन खिलारेला सुवर्णपदक
Updated On:

पुणे :– आझम कॅम्पसमध्ये सराव करणाऱ्या आंतरराष्ट्रीय खेळाडू सचिन खिलारे याने सध्या चीन येथील हंगझाऊ येथे सुरू असलेल्या आशियाई पॅरा स्पर्धेतील गोळाफेक या प्रकारात 16.03 मीटर गोळाफेक करताना सुवर्णपदक पटकावले. या सुवर्णफेकीने नवीन स्पर्धा विक्रमाची नोंददेखील करण्यात आली आहे.
यापूर्वी पॅरिस येथे झालेल्या पॅरा ऍथलेटिक वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेतदेखील सचिन खिलारेने सुवर्णपदक पटकावले होते. तसेच राष्ट्रीय स्पर्धेतदेखील सचिनने सुवर्णपदक पटकावले होते. सचिन गेल्या चार वर्षांपासून आझम स्पोर्टस अकादमीच्या मैदानावर सराव करत आहे.
सचिन खिलारेने मिळविलेल्या दिमाखदार यशासाठी महाराष्ट्र कॉस्मो पॉलिटिन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. पी. ए. इनामदार, उपाध्यक्षा आबेदा इनामदार, सचिव इरफान शेख, आझम स्पोर्टस अकादमीचे संचालक डॉ. गुलजार शेख यांनी अभिनंदन केले.




