India Beat Pakistan : अखेरच्या मिनिटात रंगला थरार! भारताने पाकिस्तानला ४-३ ने लोळवून गाठली फायनल; २८ वर्षांनंतर पहिल्यांदाच घडलं असं
India Beat Pakistan : भारताने पुरुष हॉकीच्या पहिल्या उपांत्य सामन्यात पाकिस्तानचा ४-३ असा पराभव करून २०२६ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले.

Asian Games 2026 Mens Hockey Semifinal India Beat Pakistan 4-3 Abhishek Winning Goal : जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारतीय पुरुष हॉकी संघाने पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा थरारक सामन्यात पराभव करत दिमाखात अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. पहिल्या उपांत्य सामन्यात भारताने पाकिस्तानला ४-३ अशा फरकाने पराभूत केले. शेवटच्या मिनिटापर्यंत श्वास रोखून धरायला लावणाऱ्या या सामन्यात भारताने अखेरच्या क्षणी निर्णायक गोल डागत विजय खेचून आणला.
सुरुवातीला ३-० ची भक्कम आघाडी; पाकिस्तानचा जोरदार पलटवार!
भारताने सामन्याची सुरुवात अत्यंत आक्रमक पद्धतीने केली. पहिल्याच क्वार्टरमध्ये पाकिस्तानवर २-० अशी आघाडी घेतल्यानंतर दुसऱ्या क्वार्टरमध्ये भारताने ही आघाडी ३-० अशी वाढवली. मात्र, यानंतर पाकिस्तानने सामन्यात अनपेक्षित मुसंडी मारली. एकामागून एक तीन गोल डागत पाकिस्तानने भारताची ३-० ची आघाडी ३-३ अशा बरोबरीत आणली, ज्यामुळे मैदानावरील तणाव शिगेला पोहोचला होता.
शेवटच्या ६० सेकंदात अभिषेकचा वार; पाकिस्तानचा खेळ खल्लास!
𝗔 𝗦𝗘𝗠𝗜-𝗙𝗜𝗡𝗔𝗟 𝗧𝗢 𝗥𝗘𝗠𝗘𝗠𝗕𝗘𝗥! 🇮🇳🔥
A night of intensity, emotion and unforgettable moments as India battled Pakistan all the way to a 4-3 victory and secured a spot in the Asian Games 2026 final. 🏑⚡
Take a look back at the action through our match album. 📸🇮🇳… pic.twitter.com/J3Anm19FR3
— Hockey India (@TheHockeyIndia) October 1, 2026
सामना ३-३ असा बरोबरीत असताना दोन्ही संघ विजयी गोलसाठी एकमेकांवर तुटून पडले होते. सामना शूट-आऊटमध्ये जाण्याची शक्यता असतानाच, अखेरच्या मिनिटात भारतीय स्ट्रायकर अभिषेकने अप्रतिम मैदानी गोल करत भारताचा विजय निश्चित केला. अभिषेकच्या या निर्णायक चौथ्या गोलने पाकिस्तानच्या तोंडचा घास पळवून भारताला अंतिम फेरीचे तिकीट मिळवून दिले.
कर्णधार हरमनप्रीतचे २ गोल; सुखजीतचीही मोलाची साथ!
𝗪𝗛𝗔𝗧 𝗔 𝗪𝗔𝗬 𝗧𝗢 𝗠𝗔𝗞𝗘 𝗧𝗛𝗘 𝗙𝗜𝗡𝗔𝗟! 🇮🇳🔥
India beat Pakistan 4-3, thanks to a last-minute goal in a nail-biting Asian Games 2026 semi-final, to book a place in the final and keep their title defence alive! 🏑⚡
The Indian Men’s Team now stand just one win away… pic.twitter.com/J8vmZzR8K1
— Hockey India (@TheHockeyIndia) October 1, 2026
अभिषेकच्या विजयी गोल व्यतिरिक्त भारताकडून कर्णधार हरमनप्रीत सिंगने दोन गोल डागले, तर सुखजीत सिंगने एक गोल करत सुरुवातीला भारताला मोठी आघाडी मिळवून दिली होती. भारतीय संघाने दबावाखालीही उत्कृष्ट समन्वय आणि संयमाचे प्रदर्शन करत पाकिस्तानचे आव्हान संपुष्टात आणले.
२८ वर्षांनंतर रचला इतिहास; महिला आणि पुरुष संघ फायनलमध्ये!
🇮🇳🏑 INDIA BEAT PAKISTAN!
India’s men’s hockey team defeated Pakistan 4-3 in a thrilling Asian Games 2026 semifinal to storm into the FINAL!
After dominating the first two quarters, India held its nerve under pressure and scored in the final moments to seal a sensational… pic.twitter.com/OSJWdAwCBP
— Deep Dive Analysis (@DDAnalysis_) October 1, 2026
भारतीय हॉकीच्या दृष्टीने हा दिवस अत्यंत ऐतिहासिक ठरला. तब्बल २८ वर्षांनंतर (१९९८ नंतर पहिल्यांदाच) आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचा पुरुष आणि महिला संघ एकाच वेळी अंतिम फेरीत पोहोचला आहे. भारतीय महिला हॉकी संघाने उपांत्य फेरीत कोरियाचा पराभव करून आधीच अंतिम फेरी गाठली होती.





