Asian Games Cricket : एशियन गेम्स २०२६ चा थरार! भारत-पाकिस्तान थेट क्वार्टर फायनलमध्ये; क्रिकेटचे संपूर्ण शेड्युल आणि ड्रॉ जाहीर
Asian Games Cricket : या स्पर्धेचा अधिकृत ड्रॉ नुकताच घोषित करण्यात आला असून, भारतीय पुरुष आणि महिला क्रिकेट संघांना थेट उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळाला आहे.. या स्पर्धेचा अधिकृत ड्रॉ नुकताच घोषित करण्यात आला असून, भारतीय पुरुष आणि महिला क्रिकेट संघांना थेट उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळाला आहे.

Asian Games 2026 Men Women Cricket Schedule Draws Announce : जपानमधील आयची-नागोया येथे आयोजित होणाऱ्या आगामी आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मधील पुरुष आणि महिला क्रिकेट प्रकारांचे बिगुल वाजले आहे. या स्पर्धेचा अधिकृत ड्रॉ नुकताच घोषित करण्यात आला असून, भारतीय पुरुष आणि महिला क्रिकेट संघांना थेट उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळाला आहे. आयसीसी रँकिंग आणि सीडिंगच्या आधारावर भारत, पाकिस्तान, बांगलादेश आणि श्रीलंका या आशियातील चार बलाढ्य संघांना थेट अंतिम आठ संघांमध्ये स्थान देण्यात आले आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत हे सर्व सामने टी-२० फॉरमॅटमध्ये खेळवले जाणार आहेत. (Asian Games Cricket)
पुरुष क्रिकेटचे समीकरण; क्वालिफाइंग राउंडचा थरार! (Asian Games Cricket)
पुरुष गटात थेट प्रवेश मिळालेल्या चार संघांशिवाय, उर्वरित ४ संघ क्वालिफाइंग राउंडमधून क्वार्टर फायनल गाठतील. यासाठी ग्रुप ‘अ’ मध्ये जपान, नेपाळ आणि गतवेळचा उपविजेता (सिल्वर मेडलिस्ट) अफगाणिस्तान आहे. तर ग्रुप ‘ब’ मध्ये हाँगकाँग, मलेशिया आणि ओमान या संघांचा समावेश आहे. दोन्ही ग्रुपमधील अव्वल २-२ संघ उपांत्यपूर्व फेरीत मुख्य संघांशी भिडतील.
The schedule for the Men’s Cricket tournament at the Asian Games is out! 🔥
India, Pakistan, Sri Lanka, and Bangladesh have received direct entry into the quarter-finals. 🏆#Cricket #India #AsianGames pic.twitter.com/Qkn56PO12h
— Sportskeeda (@Sportskeeda) July 24, 2026
महिला संघ थेट जपानशी भिडणार – (Asian Games Cricket)
Cricket action is going to heat up at the 20th Asian Games Aichi-Nagoya 2026 – here’s how the road to the podium looks!
WOMEN’S
India vs Japan
Bangladesh vs People’s Republic of China
Sri Lanka vs Malaysia
Pakistan vs Thailand pic.twitter.com/lcB22vm13l— Olympic Council of Asia (@AsianGamesOCA) July 23, 2026
महिला क्रिकेटमध्ये कोणतीही पात्रका फेरी नसून थेट ८ संघांमध्ये उपांत्यपूर्व फेरीचे सामने रंगतील. जाहीर झालेल्या ड्रॉनुसार, गतविजेत्या भारतीय महिला संघाचा सामना यजमान जपानशी होणार आहे. याशिवाय पाकिस्तान विरुद्ध थायलंड, श्रीलंका विरुद्ध मलेशिया आणि बांगलादेश विरुद्ध चीन असे रंगतदार सामने पाहायला मिळतील. या लढतींनंतर उपांत्य आणि अंतिम सामने होतील. उपांत्य फेरीत पराभूत होणाऱ्या दोन संघांमध्ये कांस्य पदकासाठी (Bronze Medal) सामना होईल. (Asian Games Cricket)
केव्हा आणि कुठे होणार सामने? (Asian Games Cricket)
The battle lines have been drawn! ⚔️
Eight teams. Four quarter-finals. One Asian Games gold medal. 🥇
Who are you backing to go all the way? 🏆#AsianGames #Cricket pic.twitter.com/RkYEVYIjik— Circle of Cricket (@circleofcricket) July 24, 2026
हे सर्व सामने जपानमधील कोरोगी स्पोर्ट्स पार्क येथे खेळवले जातील. महिला क्रिकेट सामने १७ सप्टेंबरपासून सुरू होणार असून, २२ सप्टेंबर रोजी अंतिम सामना खेळवला जाईल. तर २४ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर या कालावधीत पुरुष क्रिकेटचा थरार रंगणार आहे. गेल्या वेळी भारताने पुरुष आणि महिला दोन्ही गटात सुवर्णपदक (Gold Medal) जिंकले होते, त्यामुळे यंदाही दोन्ही संघ विजयाचे प्रबळ दावेदार आहेत. (Asian Games Cricket)





