Asian Games 2023 (Athletics) : 10 हजार मी. शर्यतीत कार्तिकला रजत तर गुलवीरला ब्रॉंझ…
Updated On:

हांगझोऊ :- आशियाई क्रीडा स्पर्धेत ऍथलेटिक्समध्ये पुरुषांच्या 10,000 मीटर शर्यतीत भारताने एक रजत तर एक ब्रॉंझ अशी दोन्ही पदके पटकावली. भारताचा अव्वल धाटवपटू कार्तिक कुमार याने 28:15:38 सेकंद अशी वेळ देत रजतपदक मिळवले तर, गुलवीर सिंगने 28:17:21 या वेळेसह ब्रॉंझपदक मिळवले.
ट्रॅक आणि फिल्डमधील भारताचे हे तिसरे पदक ठरले आहे. यापूर्वी किरण बालियानने महिलांच्या शॉट पुट प्रकारात ब्रॉंझपदक पटकावले होते.
दरम्यान,आज आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय धावपटू अविनाश साबळेने स्पर्धेत पुरुषांच्या ३००० मीटर स्टीपलचेस विभागात स्पर्धाविक्रमासह सुवर्णपदकावर आपले नाव कोरले आहे.





