#AsiaCup2023 Super-4 : अखेर #INDvPAK सामना सुरू, षटकांमध्ये कोणतीही कपात नाही…

India vs Pakistan Asia Cup 2023 : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यास सुरूवात झाली आहे. खेळ 24.1 षटकांच्या पुढे सुरू झाला असून शादाब त्याचे षटक पूर्ण करत आहे. तर, विराट कोहली आणि केएल राहुल क्रीजवर आहेत.हा सामना 50-50 षटकांचा होणार आहे.
दुपारी 4.40 वाजता सामना सुरू झाला. भारताने 24.1 षटकांपासून खेळण्यास सुरुवात केली असून सध्या भारताची धावसंख्या 30 षटकात 2 बाद 175 झाली असून कोहली 22*(30)तर राहुल 31*(49) धावांवर खेळत आहे.
पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हारिस रौफ आज गोलंदाजी करणार नाही. पाकिस्तान संघासाठी हा मोठा धक्का आहे. रौफने या सामन्यात पाच षटके टाकली असून 27 धावा मोजल्या आहेत. जर त्याने गोलंदाजी केली नाही तर त्याच्या जागी इफ्तिखार अहमद किंवा इतर कोणत्याही अष्टपैलू खेळाडूला गोलंदाजी करावी लागेल आणि याचा फायदा भारतीय फलंदाज घेऊ शकतात.
रौफ पूर्णपणे तंदुरुस्त नाही आणि तो खेळल्यास त्याची दुखापत आणखी वाढू शकते. पाकिस्तानी संघ व्यवस्थापन विश्वचषकापूर्वी रौफला दुखापत करू इच्छित नाही. यामुळे तो आज गोलंदाजी करणार नाही.
दरम्यान, आशिया चषक क्रिकेट स्पर्धेतला भारत-पाकिस्तान दरम्यानचा सामना काल पावसामुळे स्थगित करण्यात आला. कोलंबो इथं होत असलेल्या या सामन्यात नाणेफेक जिंकून पाकिस्ताननं क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला, भारतानं पंचवीसाव्या षटकाच्या पहील्या चेंडूपर्यंत दोन गडी बाद 147 धावा केल्या होत्या. विराट कोहली आणि के. एल. राहुल ही जोडी मैदानावर होती. कर्णधार रोहित शर्मा 56 आणि शुभमन गिल 58 धावा करून माघारी परतले होते. या सामन्यासाठी आजचा(सोमवार,दि.११) दिवस राखीव ठेवला होता.





