Asia Cup 2025 : आशिया कप सामन्यांच्या वेळेत बदल; भारत-पाकिस्तान सामना किती वाजता सुरु होणार? जाणून घ्या

Asia Cup 2025 Schedule Update : आशिया कप 2025 ची सुरुवात 9 सप्टेंबरपासून होत असून, सर्व सामने दुबई आणि अबू धाबी येथे खेळवले जाणार आहेत. तत्पूर्वी स्पर्धेच्या वेळापत्रका थोडा बदल करण्यात आला आहे. आशियाई क्रिकेट परिषदेने (एसीसी) शनिवारी, 30 ऑगस्ट रोजी जाहीर केलेल्या नव्या वेळापत्रकानुसार, सामने आता भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 8 वाजता सुरू होणार आहेत.
यापूर्वी सामने रात्री 7:30 वाजता सुरू होणार होते, परंतु आता वेळेत बदल करण्यात आला आहे. मात्र, 15 सप्टेंबर रोजी अबू धाबी येथे यूएई आणि ओमान यांच्यातील सामना स्थानिक वेळेनुसार सायंकाळी 4 वाजता (भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी 5:30 वाजता) खेळवला जाईल.
🚨 TIMING CHANGE IN ASIA CUP 🚨
– The matches are set to start at 8 pm IST due to extreme warm conditions in the UAE. [Vaibhav Bhola from News 24] pic.twitter.com/erZ53Jc4KV
— Johns. (@CricCrazyJohns) August 30, 2025
भारतीय संघाचे वेळापत्रक –
Least we can do is Boycott India – Pak match. Hit where it hurts. Boycotting match mean Low TRP. For BCCI and Broadcaster’s TRP is everything. Show the power of Civil Disobedience. Mark the date 14 sep 2025.
MAKE IT A MOVEMENT.#DeshdrohiBCCI#AsiaCup2025 #BoycottAsiaCup pic.twitter.com/aTAk1WSvGi
— Barkha Joshi (@bindasbarkha) August 21, 2025
दुबईतील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम 14 सप्टेंबर रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील बहुप्रतीक्षित सामन्याचे यजमानपद भूषवेल. हा हाय-व्होल्टेज सामना रात्री 8 वाजता सुरू होईल. भारताचा आशिया कप 2025 मधील पहिला गट अ सामना 10 सप्टेंबर रोजी दुबईत यूएईविरुद्ध होईल, तर गट अ चा शेवटचा सामना 19 सप्टेंबर रोजी अबू धाबीत ओमानविरुद्ध खेळवला जाईल.
हेही वाचा – US Open 2025 : नोव्हाक जोकोविचचा ऐतिहासिक विजय! फेडररलाही मागे टाकत नव्या विक्रमाची केली नोंद
गट आणि सामने –
आशिया कप 2025 मध्ये भारत, पाकिस्तान, यूएई आणि ओमान गट अ मध्ये, तर श्रीलंका, बांगलादेश, अफगानिस्तान आणि हाँगकाँग गट ब मध्ये आहेत. प्रत्येक गटातील पहिले दोन संघ सुपर फोरसाठी पात्र ठरतील. सुपर फोरमधील एक सामना (22 सप्टेंबर रोजी A2 विरुद्ध B1) अबू धाबीत होईल, तर उर्वरित पाच सुपर फोर सामने आणि अंतिम सामना (28 सप्टेंबर) दुबईत खेळवले जाणार आहेत. गट ब चे सहापैकी पाच सामने आणि गट अ चे दोन सामने (यूएई विरुद्ध ओमान आणि भारत विरुद्ध ओमान) अबू धाबीत होणार आहेत.





