VIDEO : आशुतोष राणांनी खास पद्धतीने साजरा केला वाढदिवस; रेणुका शहाणेंनी इशारा करताच….

Ashutosh Rana and Renuka Shahane | अभिनेते आशुतोष राणा यांनी त्यांचा ५८ वा वाढदिवस खास पद्धतीने साजरा केला. त्यांच्या बर्थडे पार्टीला जवळचे कुटुंबीय व मित्रमंडळी उपस्थित होते. वाढदिवसाला त्यांनी पत्नी रेणुका शहाणे यांच्यासोबत मिळून केक कापला. केक कापण्यापूर्वी दोघांनी एकमेकांच्या गळ्यात वरमाला घातल्या. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
व्हिडीओमध्ये दिसते की, आशुतोष राणा आणि रेणुका शहाणे यांच्या हातात वरमाला आहेत. दोघेही एकमेकांना हार घालायला जातात. आधी रेणुका हार घालण्यासाठी पुढे येतात, तोच आशुतोष राणा हार घालण्यासाठी खाली झुकतात. खाली झुकलेल्या आशुतोष राणांकडे रेणुका शहाणे पाहतात. दोघांमध्ये नजरेनं संवाद होतो.
त्यानंतर रेणुका शहाणे त्यांच्या गळ्यात वरमाला घालतात आणि आशुतोष राणा रेणुका यांना वरमाला घालतात. आशुतोष राणांनी गळ्यात वरमाळा घातल्यावर रेणुका यांनी हात जोडून त्यांना नमस्कार केला. दोघांचाही हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. दोघांमधील प्रेमाचं अतुट नातं पाहून चाहतेही त्यांचे कौतुक करत आहेत. Ashutosh Rana and Renuka Shahane |
View this post on Instagram
रेणुका शहाणे आणि आशुतोष राणा यांचा विवाह २५ मे २००१ मध्ये मध्यप्रदेशमध्ये पार पडला होता. गेली २३ वर्षे रेणुका शहाणे आणि आशुतोष राणा सुखी वैवाहिक आयुष्य जगत आहेत. लग्नानंतर रेणुका यांनी अभिनय क्षेत्रातून ब्रेक घेतला. लग्नानंतर त्या दोन मुलांच्या आई झाल्या. रेणुका आणि आशुतोष यांना शौर्यमन आणि सत्येंद्र अशी दोन मुलं आहेत. मुलं मोठी झाल्यानंतर रेणुका शहाणे अनेक वर्षांनी पुन्हा सिनेमांत काम करू लागल्या. रेणुका आणि आशुतोष यांचं लव्ह मॅरेज आहे आणि आजही त्यांचे एकमेकांवर खूप प्रेम असल्याचे या व्हिडिओद्वारे पाहायला मिळते. Ashutosh Rana and Renuka Shahane |
आशुतोष राणा यांनी आजवर हिंदीसह मराठी, कन्नड, तेलुगू, तामिळ अशा सगळ्या इंडस्ट्रीमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. रेणुका शहाणेंच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं, तर लवकरच त्या ‘उत्तर’ सिनेमात झळकणार आहेत. यात त्या अभिनय बेर्डेच्या आईच्या भूमिकेत दिसणार आहे. Ashutosh Rana and Renuka Shahane |
हेही वाचा :





