IFFI Goa : दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांच्या हस्ते गोव्यात IFFI ND’s Art World स्टॉलचे उद्घाटन
IFFI Goa : गोव्यातील ५७ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रसिद्ध दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांच्या हस्ते ND’s Art World च्या स्टॉलचे उद्घाटन.

IFFI Goa : गोव्यात सुरू असलेल्या ५७ व्या आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सवात (IFFI) ND’s Art World च्या स्टॉलचे उद्घाटन प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी ND’s Art World च्या संचालक तथा फिल्मसिटीच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील उपस्थित होत्या.
‘लगान’, ‘स्वदेस’ आणि ‘जोधा अकबर’ यांसारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन करणारे गोवारीकर हे यंदाच्या IFFI चे महोत्सव संचालकही आहेत. त्यांच्या हस्ते उद्घाटन झाल्याने ND’s Art World च्या सहभागाला विशेष महत्त्व प्राप्त झाले.
२० ते २८ नोव्हेंबरदरम्यान आयोजित या महोत्सवात ND’s Art World चित्रपट आणि मनोरंजन क्षेत्रातील विविध संधी शोधणार आहे. चित्रपट निर्माते, कलाकार, निर्मिती संस्था आणि मनोरंजन क्षेत्रातील मान्यवरांशी संवाद साधून भविष्यातील सहकार्याचे मार्ग निर्माण करण्याचा संस्थेचा उद्देश आहे. स्वाती म्हसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.




