Ashutosh Gowariker : निवड प्रक्रिया तांत्रिक कौशल्याहून वरचढ; इफ्फीचे ज्युरी अध्यक्ष आशुतोष गोवारीकर यांचे प्रतिपादन

पणजी : चित्रपटांची तुलना करणे कठीण असले तरी, पुरस्काराचे स्वरूप असा एक चित्रपट निवडणे आहे जो सगळ्यांपेक्षा वेगळा आहे. इप्फीमधील ज्युरींच्या वेगवेगळ्या दृष्टीकोनांमुळे विशेषत: चित्रपटांच्या सांस्कृतिक मतभेद आणि भावनिक पैलूंचा शोध घेताना चर्चा अधिक व्यापक झाली, असे प्रतिपादन इफ्फीतील ज्युरी अध्यक्ष आणि प्रख्यात भारतीय चित्रपट निर्माते आशुतोष गोवारीकर यांनी आज केले.
इफ्फी मधील आंतरराष्ट्रीय स्पर्धा श्रेणीच्या परीक्षकांनी आज गोव्यात माध्यमांना संबोधित केले. गोवारीकर यांच्या नेतृत्वाखालील ज्युरीमध्ये सिंगापूरचे दिग्दर्शक अँथनी चेन, ब्रिटिश अमेरिकन निर्माता एलिझाबेथ कार्लसन, स्पॅनिश निर्माता फ्रान बोर्गिया आणि ऑस्ट्रेलियन चित्रपट संकलक जिल बिलॉक या आंतरराष्ट्रीय चित्रपट तज्ञांच्या प्रतिष्ठित पॅनेलचा समावेश आहे.
सुवर्णमयुर पुरस्कार विजेत्याला महोत्सवातील सर्वोच्च सन्मानासह ४० लाख रुपयांचे बक्षीस मिळेल. या श्रेणीमध्ये १२ आंतरराष्ट्रीय आणि ३ भारतीय असे एकूण १५ चित्रपट या प्रतिष्ठित स्पर्धेसाठी निवडले आहेत.
एलिझाबेथ कार्लसन यांनी सीमा ओलांडणाऱ्या कथा सांगण्याचे महत्त्व अधोरेखित केले. उत्तम कथा आणि कल्पनांमध्ये राजकीय सीमांचा विचार न करता सीमा ओलांडण्याची शक्ती असते असे त्यांनी नमूद केले. दडपशाहीविरूद्ध वैयक्तिक विजयांचा दृष्टिकोन देणाऱ्या चित्रपटांच्या भावनिक आणि सांस्कृतिक अनुनादाचा त्यांनी ठळक उल्लेख केला.
प्रेक्षकांशी सार्वत्रिक भावनिक संबंध निर्माण करण्यासाठी उत्कृष्ट चित्रपटांमध्ये जी शक्ती असते ती, खूप महत्वाची आहे, असे अँथनी चेन यांनी सांगितले. आपल्यासाठी म्हणजे अँथनी चेनसाठी सिनेमा हा लेखक, दिग्दर्शक आणि संपादक यांच्यातील गतिमान, चैतन्यशील संभाषण आहे. चित्रीकरण आणि संपादनादरम्यान पटकथा सतत विकसित होत असते.”,हे सांगून त्यांनी आपले म्हणणे अधोरेखित केले.
फ्रॅन बोर्जिया यांनी चित्रपटांच्या विविधतेवर प्रकाश टाकला. या कथानकांमध्ये अगदी खोलवर प्रभाव टाकणा-या वैयक्तिक कथांपासून ते व्यापक सामाजिक समस्यांचे प्रतिबिंबही पहायला मिळाले, असे फ्रॅन यांनी नमूद केले.





