Tiger Attack : आष्टीत शेतकऱ्यावर वाघाचा हल्ला; अर्धा किमी फरफटत नेलं; शरीराचे लचके तोडून संपवलं
Tiger Attack : बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातून एक अत्यंत हृदयद्रावक आणि अंगावर काटा आणणारी घटना समोर आली आहे.

Tiger Attack : बीडच्या आष्टी तालुक्यात वाघाच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आलीय. देवळाली येथील शेतकरी देविदास टकले यांच्यावर लोखंडवाडी-सोनेपठार परिसरात वाघाने हल्ला केल्याची माहिती आहे. (Tiger Attack)
जनावरांसाठी गवत कापत असताना पाठीमागून झडप घालत वाघाने त्यांना जंगलात फरफटत नेले. तब्बल अर्धा किलोमीटरपर्यंत फरफटत नेल्यानंतर वाघाने त्यांच्या शरीराचे लचके तोडले. मुलाच्या आरडाओरडीनंतर वाघाने घटनास्थळावरून पळ काढला. मात्र, तोपर्यंत देविदास टकले यांचा मृत्यू झाला होता. (Tiger Attack)
विशेष म्हणजे, दुष्काळी परिस्थितीमुळे जनावरांसाठी चारा शोधण्याची वेळ शेतकऱ्यांवर आलीय. चारा छावण्या सुरू नसल्याने मुक्या जनावरांची भूक भागवण्यासाठी शेतकऱ्यांना जीव धोक्यात घालून शेतात जावं लागतंय. अशातच वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. (Tiger Attack)
वडिलांना शोधण्यासाठी मुलगा पुन्हा शेतात गेला असता, त्याला रक्ताच्या खुणा आणि फरफटत नेल्याचे निशाण दिसले. त्यानंतर ग्रामस्थांना सोबत घेऊन शोध घेतला असता डोंगर परिसरात देविदास टकले यांचा मृतदेह आढळून आला. या घटनेमुळे आष्टी तालुक्यात वन्यप्राण्यांच्या वाढत्या हल्ल्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय. (Tiger Attack)
गेल्या तीन वर्षांत आष्टी तालुक्यात वाघ आणि बिबट्याच्या हल्ल्यात चार शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याचा दावा ग्रामस्थांकडून करण्यात येतोय. देवळाली, बावी आणि धामणगाव परिसरात वाघांचा वावर वाढला असतानाही वनविभागाकडून ठोस उपाययोजना होत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय. (Tiger Attack)
या घटनेनंतर शेतकरी आक्रमक झाले असून वाघाचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी त्यांनी केलीय. अन्यथा वनविभाग कार्यालयावर आंदोलन छेडण्याचा इशारा मोहन आमटे यांनी दिलाय. (Tiger Attack)
Tiger Shroff Attack : टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट ! सुरतमधून 2 बंदुका जप्त




